नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लोकशाही टिकवण्यासाठी छत्रपतींना निवडून द्या – बंटी पाटील; सरवडे येथील प्रचार सभेत जनतेला आवाहन  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

लोकशाही टिकवण्यासाठी छत्रपतींना निवडून द्या – बंटी पाटील; सरवडे येथील प्रचार सभेत जनतेला आवाहन 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

सरवडे (दि.४ मे): लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्याने आता सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचार सभाना उधाण आले आहे. येणाऱ्या सात मे रोजी कोल्हापूर जिल्ह्यात मतदान होणार असून सत्ताधारी पक्षासह महाविकास आघाडीच्या ही नेत्यांचे देखील लक्ष आता कोल्हापूरकडे वेधले आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक ४मे रोजी राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे महाविकास आघाडीची निर्धार सभा पार पडली. सरवडे गावातील बाजारपेठेत पार पडलेल्या या सभेत लोकांची तुडुंब गर्दी जमली होती.सायंकाळी सहा वाजता सुरू झालेल्या सभेसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस  पक्षाचे नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील , चंद्रपूर मतदार संघाचे काँग्रेसचे नेते व विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार त्याचबरोबर  शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते विजय देवणे, वंचितचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष  दयानंद कांबळे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.निवडणुकीच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या या सभेत सरवडे सह आजुबाजुच्या गावातील लोकांनी ही हजेरी लावली होती.

      यावेळी सभेच्या सुरवातीला छत्रपती शाहू महाराज यांचे स्वागत सरवडे गावचे लोकनियुक्त सरपंच रणधीर मोरे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. के. मोरे यांनी केले. यावेळी बोलताना, बंटी पाटील म्हणाले, देशात लोकशाही जर टिकवायची असेल तर आपण छत्रपती शाहू महाराजांना निवडून देणे गरजेचे आहे. यावेळी बोलताना त्यानी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे वाचन देखील केले.यावर बोलताना ते म्हणाले,” देशात जर काँग्रेसचे सरकार आले तर गोरगरीब जनतेला वर्षाला १लाख रुपये मिळतील त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबाला २५लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळेल. यानंतर विजय देवणे व विजय वडेट्टीवार यांची मनोगते पार झाली.दोघांनी ही आपल्या मनोगतात प्रस्तापित सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे सभेत एकच हशा पिकला. त्यानंतर या सभेचे आभार हेमंत कोतमिरे यांनी मानून सभेची सांगता झाली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा