नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , केंद्रीय प्राथमिक शाळा केनवडे मध्ये इयत्ता पहिली प्रवेश मोठ्या उत्साहात – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

केंद्रीय प्राथमिक शाळा केनवडे मध्ये इयत्ता पहिली प्रवेश मोठ्या उत्साहात

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

केनवडे प्रतिनिधी (दि.९एप्रिल): गुढीपाडवा  म्हणजे मराठी वर्षाचा नवा दिवस, नवी प्रेरणा आणि नवा उत्साह. याच मराठी नवं वर्ष दिनानिमित्त केंद्रीय प्राथमिक शाळा केनवडे या मराठी शाळेत इयत्ता पहिली प्रवेश प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली.



यावेळी सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले . पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या छोट्या बाल चमूनीं नटून थटून आपल्या आई- बाबांचे बोट धरून शाळेत प्रवेश केला .



त्यावेळी भेट स्वरूपात सर्व मुलांना छोटी अंकलपी व पेढे देऊन नवागतांचे स्वागत केले. प्रत्येक आई बाबांच्या मनातही शाळेबद्दल उदंड आत्मविश्वास भरला होता. आपलं मूल या शाळेत त्याचं भविष्य घडवणार आहे हा विश्वास भरून उरला होता . मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थ यांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात इयत्ता पहिली चा प्रवेश प्रक्रिया आजच्या नव्या दिवशी पार पडली .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा