नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कुकूडवाडी येथील धोकादायक स्थितीत असलेली डीपी स्थलांतरित करण्यास मंजुरी, सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांच्या मागणीला यश   – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

कुकूडवाडी येथील धोकादायक स्थितीत असलेली डीपी स्थलांतरित करण्यास मंजुरी, सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांच्या मागणीला यश  

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 खरा प्रज्ञावंत /प्रतिनिधी (दि.१८मार्च): कुकूडवाडी, ता.राधानगरी येथील अंगणवाडी समोर व मुख्य रस्त्या लगतच असलेली महावितरण ची जीर्ण व धोकादायक स्थितीत असलेली डीपी (रोहित्र) आहे. रस्त्या लगत असलेली ही डीपी भविष्यात लहान मुलांना तसेच नागरीकांना धोकादायक ठरू शकते ; त्यामुळे भविष्यात या पासून मोठी हानी होऊ नये ती डीपी स्थलांतरीत कऱण्यात यावी यासाठी गावचे नागरीक तथा सामजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांनी शासनाकडे गेली तीन महिने सतत पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून लवकरच ही डीपी स्थलांतरीत करण्यात येणार आहे.


गावातील धोकादायक असलेली डीपी

     यासाठी राधानगरीचे आमदार मा.प्रकाश आबिटकर यांनी डिपीटीसी मधून निधी उपलब्ध करुन मंजुरी मिळवून दिली आहे. त्याबद्दल गावातील ग्रामस्थांकडून आमदार प्रकाश आबिट कर यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

   ही बातमी समजल्यानंतर सुनील पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गारगोटी येथील निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन आभार व्यक्त केले,यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी प्रकाश आंबेकर,अमित चौगले ही उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा