नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सावर्डे पाटणकर येथे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून मंजूर कामाचा शुभारंभ  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

सावर्डे पाटणकर येथे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून मंजूर कामाचा शुभारंभ 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

नीसावर्डे पा. (दि.१६ मार्च):   राधानगरीतील सावर्डे पाटणकर येथे माननीय आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून आजवर लाखो रुपयांचा निधी गावच्या विकास कामास मंजूर झाला आहे.



त्यापैकी सावर्डे पाटणकर गावातील स्मशान भूमीसाठी १० लाख रुपयांचा निधी तर गावच्या ज्योतिर्लिंग देवालयाच्या दर्शरांग व सभा मंडपासाठी तब्बल २० लाखाचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती ग्रामपंचायती कडून देण्यात आली होती. आता याच दोन्ही कामाचा शुभारंभ गावच्या लोकनियुक्त सरपंच श्रीम. सुमन विलास मोरे यांच्या हस्ते शनिवार दि. १६ मार्च रोजी करण्यात आला.



याप्रसंगी बोलत असताना गावचे नागरीक व राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संभाजी पाटील सर यांनी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त करत गावात गेली दीड वर्षात विकास कामे धडाक्याने सुरू आहेत आणि येणाऱ्या काळात देखील जास्तीत जास्त निधी आणून गावचा विकास होईल असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर कार्यकुशल व कार्यक्षम ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन देखील केले.



यावेळी ग्रामपंचायत सरपंच यांच्या समवेत डे. सरपंच सुरेश परीट व ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य, कर्मचारी व गावचे ग्रामस्थ तसेच तरूण मंडळाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा