नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 केनवडे/प्रतिनिधी(दि. १३मार्च): कागल तालुक्यातील केनवडे गावचे सुपुत्र श्री. जे. के. कांबळे यांची कोल्हापूर जिल्हा विस्तार हिवताप अधिकारी पदावर निवड झाल्याची घोषणा राज्याचे आरोग्य विभागातील हिवताप प्रमुख अधिकारी राधाकृष्ण पाटील यांनी केली. श्री.जे. के. कांबळे हे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण रुग्णालय कोल्हापूर(सीपीआर) मध्ये सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी पदावर काम करत होते. त्यानंतर आता त्यांची निवड कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण रुग्णालयात जिल्हाविस्तार हिवताप अधिकारी पदावर झाली आहे.



   तब्बल १२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांना ही पदोन्नती प्राप्त झाली आहे. या १२ वर्षाच्या काळात जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य विभागात जिल्हा सहाय्यक हिवताप अधिकारी म्हणून त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली. जिल्ह्यात कोरोना काळात त्यांनी अतिशय जबाबदारीने व कर्तव्यदक्षपणे आपले काम पार पाडले त्याचबरोबर डेंग्यूसदृश भागात काम करत असताना त्यांनी स्वतःला वाहून घेऊन आपले कर्तव्य पार पाडले. या त्याच्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन वरीष्ठ व जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांचा विशेष सत्कार देखील कऱण्यात आला आहे. निवड झाल्यानंतर सत्कार प्रसंगी बोलताना त्यांनी,’ आपल्या १२ वर्षाच्या सेवेचे उचित फळ मिळाल्याचे सांगितले.’



    त्यांच्या या सत्कार प्रसंगी कोल्हापूर मंडल उपसंचालक डॉ. दिलीप माने, डॉ. योगेश साळे सहाय्यक संचालक हिवताप कोल्हापूर व आरोग्य विभागाचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा