नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जातीय वैमनश्यातून होणाऱ्या अत्याचारास आळा घालून कठोर करवाई व्हावी यासाठी बहुजन समाज पार्टी चे कोल्हापूर पोलीस अधिक्षकांना निवेदन  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

जातीय वैमनश्यातून होणाऱ्या अत्याचारास आळा घालून कठोर करवाई व्हावी यासाठी बहुजन समाज पार्टी चे कोल्हापूर पोलीस अधिक्षकांना निवेदन 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा (दि. ११मार्च) :  काही दिवसांपूर्वी कागल तालुक्यातील व्हनाळी येथे जातीय द्वेषातून अनुसुचित जाती समाजातील व्यक्तीवर अन्याय झाल्याची घटना समोर असतानाच आता करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशातील जातीयवादाबरोबरच आता पुरोगामी विचारसरणी असलेल्या या शाहुनगरीत आता जातीय क्लेश उफाळून येत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.त्यामुळे देशात अनुसुचित जाती जमातीच्या लोकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. देशात कायदा व सुव्यवस्था असताना देखील असे घडणारे प्रकार हे देशातील समानता दुभंगणारे आहेत त्यामुळे देशात कायदा व सुव्यवस्थेचा वापर करुन अशा जातीय दंगली घडवणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी त्याच बरोबर कोल्हापूर जिल्हयातील व्हनाळी तसेच करवीर मधील गडमुडशिंगी येथील अनुसुचित जातीतील व्यक्तींवर झालेला अन्यायाविरुद्ध कायद्याचा योग्य वापर करून त्यांना न्याय मिळावा अशा प्रकारचे निवेदन बहुजन समाज पार्टीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रवींद्र तुकाराम कांबळे यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात दिले.     आज भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सुध्दा कोल्हापूर सारख्या पुरोगामी नगरीत अजूनही अनु.जाती जमातीवर अन्याय अत्याचार होत आहेत, हे दुःखद आणि खेदजनक आहे. तसेच ही बाब कोल्हापूर जिल्हयाच्या नामुष्कीला सुध्दा कारणीभूत आहे. कोल्हापूर जिल्हयात घडणाऱ्या अशा घटनामुळे देशभरामध्ये छ.शाहू महाराजांच्या विचारांना आदर्श मानणाऱ्या फार मोठ्या वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. कृपया आपण याची दखल घ्यावी. तसेच योग्य ती कठोर पावले उचलून फौजदारी स्वरुपाची कारवाई देखील करावी. अशा प्रकारची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.      याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा बहुजन समाज पार्टी चे प्रभारी मा. किरणजी अल्हाट,जिल्हा प्रभारी मा. संदिप शिंदे,माजी जिल्हा अध्यक्ष मा. अजय कुरणे,जिल्हा प्रभारी मा. अमर शिंदे, जिल्हा अध्यक्ष मा. रवींद्र कांबळे ,जिल्हा उपाध्यक्ष मा. एकनाथ पाटील ,जिल्हा सचिव मा.बापू पवार ,जिल्हा सचिव मा. सुरेश आठवले, शहराध्यक्ष मा. मारुती कसबे,जिल्हा उपाध्यक्ष मा. मोहन कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष मा. चंद्रकांत कापशीकर,जिल्हा महासचिव मा. श्रीकांत कांबळे,जिल्हा बामसेफ संयोजक मा.शाम पाखरे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा