नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वंचितांच्या राजकीय न्याय, हक्क निर्धार सभेला हजारोंचा जनसागर एकवटला – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

वंचितांच्या राजकीय न्याय, हक्क निर्धार सभेला हजारोंचा जनसागर एकवटला

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

इचलकरंजी (दि.८मार्च):  देशात एकीकडे भाजप विरुद्ध महा विकास आघाडीच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र वंचित बहुजन आघाडीच्या चर्चांना उधाण येत आहे. वर्धा, अकोला, पुणे आणि त्यानंतर आता कोल्हापुरातील इचलकरंजी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे येथील मैदानात घेण्यात आलेली सभा हा सर्वच राजकीय घडामोडींची दिशा बदलणारा आहे.     महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या या वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय न्याय, हकक निर्धार सभेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकीकडे याच शहरात घेण्यात आलेल्या प्रस्तापित सरकारच्या सभेची  गर्दी आणि इथे जमलेल्या  वंचित बहुजन आघाडीच्या सभेची गर्दी  याची तुलना करावी, असा खरपूस टोला वंचित बहुजन आघाडीचेराज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळोखे यांनी यावेळी सभेसमोर बोलताना केला.  त्याच बरोबर या सरकारने देशातील लोकांना कसं फसवले  आहे याचं उदाहरण देताना OBC समाजाच्या हितासाठी काढण्यात आलेल्या PM विश्वकर्मा योजनेची कशी लूट केली याचा खुलासा केला.

सभेला संबोधित करताना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर

सभेला संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीच्या राज्याधक्षा रेखाताई ठाकूर म्हणाल्या,” भारतीय संविधानाने महिलाना राजकीय, सामाजिक, सामान संधीचे  अधिकार दिले; परंतु आजही इथल्या सरकारने ९०% महिलाना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवले आहे. सध्याचे सरकार हे गुंडांच सरकार आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहिलं पाहिजे. ” त्यानंतर सभेच्या शेवटी  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी बोलताना सांगितले की, सध्याच्या सरकारचे वर्चस्व जर संपवायचे असेल तर युती करावी लागेल; परंतु त्यांच्यातीलच वादामुळे याबाबत चर्चा केली नसल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली पण आपण शेवटपर्यंत युतीचा विचार करू असेही त्यांनी बोलताना सांगितले. याशिवाय बोलताना त्यांनी मोदींच्या वर घणाघाती टिका  करत देशाला कर्जबाजारी करुन स्वतः हिमालयात जाण्याची घोषणा करणाऱ्या सरकारला आगामी निवडणुकांमध्ये आपण जागा दाखवावी असे आवाहन केले.


                     जाहिरात


सायंकाळी ६ वाजता सुरु झालेल्या या सभेला वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हाप्रभारी क्रांती सावंत, राज्य युवा उपाध्यक्ष आफ्रोजजी मुल्ला, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ जी बनसोडे, सर्वजीत बनसोडे, किसन चव्हाण , जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे व कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी उपस्थित होते. हजारोंच्या संख्येत जमलेल्या या सभेत काही लोकांनी वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय लढ्यासाठी आर्थिक मदत म्हणून रोख रक्कम व धनादेशाच्या रुपात देखील मदत केली. एकंदरीत अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता घेणाऱ्या या  पक्षाला आता येणाऱ्या काळात चांगले भवितव्य असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा