नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नवविवाहितांना माहेरचा आहेर-रुकडी ग्रामपंचायतचा ठराव – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नवविवाहितांना माहेरचा आहेर-रुकडी ग्रामपंचायतचा ठराव

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रुकडी/प्रज्ञावंत वृत्तसेवा(दि.८मार्च):

हातकणंगले तालुक्यातील रुकडी ग्रामपंचायत ने नवविवाहित मुलीला माहेरची साडी चोळी देण्याचा मासिक सभेमध्ये ठराव केला अशी माहिती सरपंच राजश्री रुकडीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या योजनेसाठी मुलीच्या लग्नावेळी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे असावे व मुलीचे आई-वडील रुकडी गावचे रहिवासी असणे बंधनकारक आहे. ही योजना आठ मार्च या जागतिक महिला दिन पासून सुरू होणार आहे.

मुलीचे लग्न आई-वडिलांच्या संमतीने होणे गरजेचे आहे इत्यादी अटी पूर्ण करणाऱ्या व रुकडी गावच्या रहिवासी असणाऱ्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ मिळणार आहे असे सरपंच रूकडी कर यांनी सांगितले गावातील कुटुंबाने याचा लाभ घ्यावा अशी यावेळी सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेला उपसरपंच शितल खोत, ग्रामपंचायत सदस्य श्वेता दाभाडे, वनिता गायकवाड, सुजाता कांबळे, मालती इंगळे, शोभा कोळी, समुवेल लोखंडे, राहुल माने, संतोष रुकडीकर, रमेश कांबळे आदी. उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा