नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिक्षक पदी निवड झालेल्या तरूणांचा भीम क्रांती तरुण मंडळाकडून सत्कार  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

शिक्षक पदी निवड झालेल्या तरूणांचा भीम क्रांती तरुण मंडळाकडून सत्कार 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

सावर्डे पा.(दि.२७ फेब्रु.):

शालेय शिक्षण विभागाकडून राज्यात २१हजार ६७८ जागांसाठी शिक्षक भरतीची कार्यवाही पवित्र पोर्टल द्वारे सुरु झाली असून त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील मुलाखती शिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक २५फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध कऱण्यात आली. त्यामुळे खूप वर्षापासून शिक्षक बनण्याची इच्छा उराशी बाळगून असलेल्या D.Ed व B.Ed धारक उमेदवारांची अखेर स्वप्नपूर्ती झाली. शालेय शिक्षण विभागाकडून नुकत्याच प्रसिद्ध कऱण्यात आलेल्या या यादी मध्ये राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर गावातील संदीप दिलीप कांबळे व सुधीर आनंदा शेंडगे या दोन तरुणांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक पदी निवड झाली आहे.


भीम क्रांती तरूण मंडळाच्या वतीने सत्कार करताना ग्रामपंचायत सदस्य आनंदा कांबळे व मंडळाचे कार्यकर्ते विठ्ठल कांबळे

सामान्य कुटुंबात जडणघडण झालेल्या या तरुणांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर हे यश संपादन केल्यामुळे संपुर्ण गावात त्यांच्या यशाचे कौतुक होत आहे. त्यांचे हे यश समाजातील अनेक तरूण – तरुणींना दिशा दर्शक ठरणारे आहे. याच गोष्टीची दखल घेऊन भीम क्रांती तरूण मंडळाच्या वतीने या तरूणांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा सावर्डे पाटणकर गावातील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे पार पडला असून याप्रसंगी गावचे ग्राम पंचायत सदस्य आनंदा कांबळे, माजी सरपंच परसू य. कांबळे तसेच भीम क्रांती तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ कांबळे(सर )यांनी केले तर विठ्ठल कांबळे व प्रा. सुरेश कांबळे यांनी आपल्या मनोगतातून दोन्हींही तरुणांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानून ग्रामपंचायत सदस्य आनंदा कांबळे यांनी या कार्यक्रमाची सांगता केली.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा