नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ढसाळ ‘ नावाचं वादळी झंझावात आता पडद्यावर – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

ढसाळ ‘ नावाचं वादळी झंझावात आता पडद्यावर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा:

पद्मश्री नामदेव ढसाळ म्हणजे वादळ. दीनदलित व शोषित समाजाला नव संजीवनी देणारा, शब्दात विद्रोहाची आग असणारा पॅंथर, महाराष्ट्राच्या साहित्याला ग्लोबल करणारा पहिला कवी, त्यांचे जीवन चरित्र म्हणजे एक ज्वलंत आदर्श मशाल आहे. महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण देशांमध्ये पॅंथरणे सामाजिक व राजकीय प्रकारचे वादळ निर्माण केले होते. द बायोस्कोप फिल्म ने बंडखोर कवी व दलित पॅंथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या बायोपिकच्या निर्मितीचे अधिकार अधिकृतपणे त्यांच्या कुटुंबीयांकडून घेतले असून सखोल संशोधन व अभ्यासांती हा चित्रपट ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यासाठी सज्ज होत आहे. त्यांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती करण्याचे आव्हान पेलले आहे ते संजय पांडे यांनी. ढसाळ यांच्या देश विदेशातील च्याहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

संजय पांडे निर्मित, वरुणा राणा लिखित व दिग्दर्शित ,प्रताप गंगावणे यांच्या संवादासह या बायोपिक मध्ये ढसाळ यांच्या संघर्षाचे वास्तविक चित्रण करण्यात येणार आहे या चित्रपटाची निर्मिती सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू होऊन २०२५ मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ढसाळ यांचे जीवन एक ज्वलंत कथा आहे. खेडेगावातील महार वाड्यात जन्मलेल्या, मुंबईतील कामठीपुरा येथे बालपण गेलेल्या ढसाळ यांनी आपल्या कवितेचा ठसा जागतिक स्तरावर उमटविला. त्यांनी उभारलेली कट्टर दलित पॅंथर चळवळ व बंडखोर कविता मधून त्यांनी अन्याय ,शोषिताविरुद्ध व गोरगरिबांसाठी च्या हक्कांचा लढा त्यांनी दिला. जातीच्या फिल्टरशिवाय त्यांचे विचार हे सर्व समाजाच्या थेट अंतकरणाला भिडतात कारण त्यांचे विचार प्रखर व तात्विक होते. ढसाळ व्यक्ति पेक्षा शक्तिशाली प्रक्षोभक असा विचार होता आणि हा विचार आव्हानात्मक असल्याने तो तमाम लोकापर्यंत पोहोचविण्यासाठी एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्याला प्राधान्य दिले असल्याचे लेखिका व दिग्दर्शिका वरुणा राणा यांनी सांगितले.

नामदेव ढसाळ यांचा १५ फेब्रुवारी हा जन्मदिवस आणि ढसाळ नावाचं झंजावत शांत झाल्याला १० वर्षे झाली. ढसाळ यांचा समग्रपणा, विचारीपणा, कवी मन व माणसा प्रती असलेला प्रचंड जिव्हाळा या साऱ्या गोष्टी आपल्याला ढसाळ या चित्रपटातून दिसतील. या चित्रपटात ढसाळ यांच्या समग्र जीवनाबरोबरच त्यावेळीची क्रांतिकारक परिस्थिती, राजकारण, पूर्ण दलित पॅंथरची दहशत असलेली चळवळ असा सर्वांगीण लेखाजोखा उभा राहील. हा बायोपिक एक महत्त्वाचा ऐतिहासिक’ बखरनामा’ आहे. अशी प्रतिक्रिया ढसाळ यांची पत्नी यांनी दिली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा