नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माणगाव ता- हातकणंगले येथील ग्रामस्थांचे विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दिनांक 12 पासून आमरण उपोषण    – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

माणगाव ता- हातकणंगले येथील ग्रामस्थांचे विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दिनांक 12 पासून आमरण उपोषण   

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पत्रकार -उत्तम कांबळे केनवडेकर

महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त माणगाव मध्ये लंडन हाऊस, हालो ग्राफिक शो आणि जुन्या तक्क्यासह बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात आले .मार्च 2020 मध्ये या स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार होते, पण कोरोना साथीमुळे लोकार्पण सोहळा स्थगित करण्यात आला. त्यानंतर लोकार्पण सोहळा न झाल्याने हे स्मारक दुर्लक्षित होऊ लागले आहे. माणगाव मधील बौद्ध समाजाने स्वतःच्या मालकीची गट नंबर ८७ मधील १ हेक्टर ८२ आर इतके क्षेत्र शासनाला विना मोबदला उपलब्ध करून दिले आहे. या जागे सभोवती संरक्षण भिंत बांधण्यासह महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित घटना तसेच माणगाव मधील ऐतिहासिक परिषदेशी संबंधित शिलालेख बौद्ध विहार आणि त्यास संलग्न ५हजार चौरस फूट क्षेत्रातील ग्रंथालय उभारत तिथे बौद्ध धम्म विषयक अभ्यासासाठी ग्रंथ आणि पुस्तके उपलब्ध करून देणे,१०० भंतेजीसाठी निवासस्थान इमारत उभी करणे. छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळे उभारणे, मुख्य प्रवेशद्वारावर परिषदेचे जनक आप्पासाहेब पाटील यांचे स्मारक इत्यादी कामाचा या आराखड्यात समावेश आहे.

२०१९ मध्ये या स्मारकासाठी सुमारे १६९ कोटींचा निधी अपेक्षित होता मात्र आता स्मारकांतर्गत कराव्या लागणाऱ्या कामाचा विकास आराखडा जवळपास २२५ कोटीच्या वर जाणार आहे, त्यामुळे स्मारकाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या उपोषणात माणगाव गावचे सरपंच राजू मगदूम ,उपसरपंच अख्तर भालदार, राजगोंडा पाटील यांच्यासह माणगाव ग्रामपंचायत चे सर्व सदस्य व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा