नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने ग्रामपंचायत देऊळवाडीस निवेदन; निवेदनात ग्रामपंचायत कारभाराबाबत विविध मागण्यांचा समावेश – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने ग्रामपंचायत देऊळवाडीस निवेदन; निवेदनात ग्रामपंचायत कारभाराबाबत विविध मागण्यांचा समावेश

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

देऊळवाडी, प्रतिनिधी/दि.७ फेब्रु. :

भुदरगड तालुक्यातील देऊळवाडी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक ७ फेब्रुवारी रोजी मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रामुख्याने बौध्द समाजासाठी मजूर हॉल बौध्द वस्तीत बांधणे, तसेच ग्रामपंचायतीच्या १५टक्के निधीबाबत खुलासा करणे, ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कामाची सविस्तर माहिती व १४ – १५ वा वित्त आयोगातून करण्यात आलेल्या कामाची संपुर्ण माहिती मिळावी , आशा प्रकारच्या विविध प्रकारच्या मागण्या केल्या आहेत, त्याचबरोबरच मागण्याची पूर्तता न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा ही देण्यात आला आहे.

 

हे निवेदन ग्रामपंचायत कार्यालय देऊळवाडी येथील सचिव कुलदीप देसाई यांच्याकडे देण्यात आले असून यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत, त्याचबरोबर

समीर खेडेकर, बाळू कांबळे ,नंदकुमार कांबळे, बादल दिवेकर, सुरेश कांबळे, भिकाजी कांबळे, सुशांत कांबळे, सचिन कांबळे, बाजीराव कांबळे, सचिन कांबळे व इतर कार्यकर्ते -ग्रामस्थ देऊळवाडी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा