नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अक्कलकोट शहरात हजारो भीमसैनिकांच्या उपस्थित आंबेडकरी जनतेचा विशाल जनाक्रोश महामोर्चा – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

अक्कलकोट शहरात हजारो भीमसैनिकांच्या उपस्थित आंबेडकरी जनतेचा विशाल जनाक्रोश महामोर्चा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

अकल्लकोट( दि.०५ फेब्रु.२०२३):

कर्नाटकातील गुलबर्गा येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशी द्या. तसेच अक्कलकोट शहर व तालुक्यात वाढत असलेल्या जातीवादी प्रवृत्तींना वेळीच आवर घाला. त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, यासारख्या विविध मागण्यांसाठी अक्कलकोटमध्ये सोमवारी (दि.५) आंबेडकरी जनतेचा विराट असा जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला.आंबेडकरी समाजासह बहुजन समाजातील जवळपास २५ हजाराहून अधिक महिला, नागरिक, अबालवृद्ध या जन आक्रोश महामोर्चात सहभागी झाले होते. दुपारी 1:00 वाजता भीमनगर येथून मोर्चेला सुरवात झफत्तेसिंह चौक, कारंजा चौक,एस टी स्टॅन्ड,नवीन राजवाडा मार्गे ए-वन- चौक पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आणि ए-वन-चौक येथे मोर्च्याच रूपांतर जाहीर सभेत झाले.शहर व ग्रामीण भागातील मागासवर्गीय बांधवांवर मोठ्या प्रमाणात होत असलेला अन्याय अत्याचार, जातीयवाद, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर संपूर्ण भारत देश चालतो त्यांच्याच पुतळ्याची गुलबर्गा येथे विटंबना करण्यात आली होती. तसेच अक्कलकोट तालुक्यातील बाणजगोळ, घोळसगाव, हालहळळी यासह विविध गावात मागासवर्गीय जनतेवर मोठया प्रमाणात अन्याय वाढला आहे. या अत्याचाराविरुद्ध व अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला.यावेळी आंबेडकरी चळवळीतील नेते माजी नगरसेवक उत्तम गायकवाड आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अमर शिरसाठ, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे विकी बाबा चौधरी, बसपाचे तालुका अध्यक्ष विठ्ठल अरेनवरू, अजय मुकणार, संदीप मडीखांबे, शिलामणी बनसोडे, जेष्ठ नेते चंद्रकांत इंगळे, माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड, छात्र भारती संघटनेचे सचिन बनसोडे, तुकाराम दुपारगुडे, पुण्याचे रामभाऊ सोनकांबळे, राहुल रूही, सागर सोनकांबळे, बाबूराव बनसोडे, यशवंत नडगम आदींसह विविध नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा पार पडली.यावेळी मा. उपगराध्यक्ष BSP तालुका अध्यक्ष विठ्ठल आरेनवरू, मा. नगरसेवक उत्तमजी गायकवाड, चंद्रशेखर मडीखांबे, अविनाश मडीखांबे,विकी चौधरी, अमर सिरसाट, सागर सोनकांबळे, अजय मुकणार, परशुराम भगळे आदिनी मार्गदर्शन केले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा