नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राज्यातील शासकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर ७ फेब्रुवारीपासून संपावर – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

राज्यातील शासकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर ७ फेब्रुवारीपासून संपावर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मुंबई /खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा 

राज्यातील शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी प्रशासन आणि शासन गेल्या वर्षीपासून तोंडी आश्वासने देत आहेत, डॉक्टरांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने राज्यातील सर्व निवासी डॉक्टर बुधवारी (दि. ७) संध्याकाळी पाच वाजल्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत.

सेंट्रल मार्डने गेल्या वर्षी ३ जानेवारीला संप मागे घेतला होता. परंतु, आज त्या आश्वासनाला ३९३ दिवस उलटून गेले आहेत, तरीही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. सेंट्रल मार्डने आजपर्यंत २८ पत्रे लिहून प्रशासकीय आणि मंत्री स्तरावर पाठपुरावा केला आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या भेटीत, डॉक्टरांच्या सर्व मागण्या लवकरात लवकर सोडवण्याचे तोंडी आश्वासन देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. एक जबाबदार नागरिक आणि डॉक्टर या नात्याने, संपादरम्यान रुग्णसेवेला अडथळा निर्माण झाल्याबद्दल आम्ही अत्यंत दिलगीर आहोत आणि सर्व आपत्कालीन सेवा कायम राहतील. तसेच संपा दरम्यान कोणत्याही बाधित रुग्णांच्या काळजीची जबाबदारी पूर्णपणे सरकारवर असल्याचे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. अभिजीत हेलगे यांनी सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा