नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटना (सिटु) तर्फे आज कोल्हापुरात भव्य मोर्चा   मागण्या मान्य न झाल्यास आठ फेब्रुवारी पासून बेमुदत ठिय्या आंदोलना चा इशारा  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटना (सिटु) तर्फे आज कोल्हापुरात भव्य मोर्चा   मागण्या मान्य न झाल्यास आठ फेब्रुवारी पासून बेमुदत ठिय्या आंदोलना चा इशारा 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोल्हापूर/उत्तम कांबळे केनवडेकर

५ फेब्रुवारी २०२४.

आज महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे वीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा आहेत. मात्र त्या प्रमाणात बांधकाम कामगारांना लाभ मिळत नाहीत. अनेक कामगारांचे अर्ज कोणतीही त्रुटी नसताना अवैध केले जात आहेत, प्रत्यक्ष पडताळणी झालेल्या कामगारांचे अर्ज अवैध केले जात आहेत, अवैध झालेले अर्ज परत ऑनलाईन करता येत नसल्याने बांधकाम कामगारांच्या मुलांना त्या वर्षाच्या लाभांपासूनच वंचित राहावे लागते.


आंदोलनातील सहभागी कार्यकर्ते

अर्ज भरत असताना अनेक तांत्रिक अडचणी उद्भवतात, तसेच कामगारांना वस्तू स्वरूपात वैयक्तिक लाभ देत असताना ठेकेदारांचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. बांधकाम कामगारांना भांड्याचा सेट देण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे व कामगार ऐवजी ठेकेदाराचा फायदा होत आहेबांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या मात्र त्यांची अंमलबजावणी झालेली नाही, त्यांची अंमलबजावणी त्वरित करावी. असे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर यांना देण्यात आले.

या व अशा विविध अनेक मागण्यांसाठी सिटु प्रणित लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आज सहाय्यक बांधकाम कामगार आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून हजारो बांधकाम कामगार आले होते . कामगारांच्या कल्याणार्थ विविध घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाला जिल्हाध्यक्ष कॉ भरमा कांबळे , जिल्हा सचिव कॉ. शिवाजी मगदूम, सिटु कार्याध्यक्ष कॉ चंद्रकांत यादव,कॉ प्रकाश कुंभार,कॉ भगवानराव घोरपडे,कॉ संदीप सुतार,कॉ विक्रम खतकर,कॉ शिवाजीराव मोरे,कॉ आनंदा कराडे,कॉ दिलीप माने,कॉ राजाराम आरडे,कॉ शिवाजी कांबळे,कॉ मोहन गिरी यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारीही उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा