नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ब्राईट आर्मीच्या मिशन कॅम्पला लोकांचा चांगला प्रतिसाद ; कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून तरुणांचा सहभाग  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

ब्राईट आर्मीच्या मिशन कॅम्पला लोकांचा चांगला प्रतिसाद ; कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून तरुणांचा सहभाग 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा/दि. ०४ फेब्रु.२०२४:  

सद्याची सामजिक परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात जातीय विषमता वाढण्याची तीव्र जाणीव होत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आंबेडकरी समाजासमोर अनेक सामाजिक, राजकीय आव्हाने तोंड वर करू पाहत आहेत.

शिबिरास उपस्थित अनुयायी

 

त्यामुळे येणाऱ्या काळात या सर्व प्रश्नांना सामोरे जात असताना समाजातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्याची महिती देऊन व सामाजिक व राजकीय दृष्ट्या त्यांना सक्षम बनविण्यासाठी ब्राईट आर्मी तर्फे मिशन मॅनेजमेंट कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा, चंदगड व अन्य तालुक्यातून बहुसंख्य आंबेडकरी अनुयायांनी हजेरी लावली.

ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर ,गारगोटी येथे या शिबीराचे आयोजन केले असून या शिबिराच्या पहिल्याच दिवशी अनेक अनुयायांनी भरघोस प्रतिसाद देत शिबिराला चांगलीच रंगत आणली. हे शिबीर सकाळी ११ वाजता सुरु झाल्यानंतर पहिल्या सत्रात ओळख व परिचय झाल्यानंतर कार्यक्रमाच्या उद्देशाबद्दल माहिती देण्यात आली. त्यांनतर दुपारच्या सत्रात सहभोजन झाल्यानंतर शिबिरात विविध विषयांतून मार्गदर्शन करण्यात आले.

दुसऱ्या सत्रातील एक क्षणचित्र

त्या नंतर रात्री सहभोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर कलासंगीत कार्यक्रमातून समाज प्रबोधन करणाऱ्या गीतांचा कार्यक्रम आणि शेवटी शेकोटी कार्यक्रमाने पहिल्या दिवशीच्या शिबिराची सांगता झाली. दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरात एकंदरीत समाजातील एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना विविध विषयांचे सखोल मार्गदर्शन दिले जाणार असून भविष्यातील होणाऱ्या अन्याय , अत्याचार विरोधात संघटित राहून सामजिक विकास कसा साधता येतो याची महिती दिली जाणार आहे. त्यामुळे या शिबिरात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन ब्राईट आर्मी च्या कार्यकारणी द्वारे कऱण्यात आली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा