नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सरकारने भारत तांदूळ लाँच केला! किंमत २९ रुपये किलो असणार – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

सरकारने भारत तांदूळ लाँच केला! किंमत २९ रुपये किलो असणार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
लाईव्ह प्रज्ञावंत वृत्तसेवा

नवी दिल्ली :- गेल्या काही दिवसापासून देशातील महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. आता महागाई कमी करण्यासाठी केंद्राने ‘भारत तांदूळ’ लाँच केला आहे, पुढच्या आठवड्यापासून हा स्वस्तातील तांदूळ बाजारात मिळणार आहे. हा तांदूळ २९ रुपये किलो दराने मिळणार. तसेच दर शुक्रवारी दुकानदारांना तांदळाचा स्टॉक सरकारला द्यावा लागणार.

या योजनेबाबत केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी माहिती दिली. चोप्रा म्हणाले की, गेल्या एका वर्षात तांदळाच्या किरकोळ आणि घाऊक किमतीत सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली. निर्यातीवर बंदी असतानाही किमती वाढतच आहेत. त्यामुळे किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने ‘भारत राईस’ बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. भारत तांदूळ नाफेड आणि एनसीसीएफ सहकारी संस्थांमार्फत २९ रुपये प्रति किलो दराने बाजारात विकला जाईल. याशिवाय केंद्र भंडारच्या रिटेल चेनवरही भारत तांदूळ उपलब्ध करून दिला जाणार आहे.

‘भारत राईस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही उपलब्ध करून दिला जाईल. पुढील आठवड्यापासून Yaad ब्रँड ५ आणि १० किलोच्या पॅकिंगमध्ये लोकांना उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात सरकारने ५ लाख टन तांदूळ किरकोळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. महागाई आटोक्यात येईपर्यंत निर्यातबंदी संपवण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तांदूळ निर्यातीवरील बंदी तूर्तास कायम राहणार आहे.

महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने यापूर्वीच भारत आटा आणि हरभरा बाजारात आणला होता. भारत पीठ २७.५० रुपये किलो आणि भारत डाळ ६० रुपये किलो दराने विकली जात आहे. मंत्रालयाच्या नवीन सूचनांनुसार, किरकोळ विक्रेते आणि घाऊक विक्रेत्यांना दर शुक्रवारी पोर्टलवर तांदळाचा साठा जाहीर करावा लागेल.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा