नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बार्टी कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक पाक्षिक दिन मोठ्या उत्साहात साजरा   – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

बार्टी कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक पाक्षिक दिन मोठ्या उत्साहात साजरा  

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
वसमत प्रतिनिधी : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या मूकनायक पाक्षिक वृत्तपत्रास ३१ जानेवार रोजी १०४ वर्षे पुर्ण झाली असून या दिवसाचे महत्त्व ओळखून बार्टी कडून बौध्द वाडा वसमत याठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध , परपुज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्योती कुबडे होत्या तर प्रमुख व्यक्ते म्हणून बार्टी समतादूत आळणे मिलिंद साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले . त्यावेळी बोलताना ते म्हणाले, “डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी 104 वर्षापूर्वी केलेल मूकनायक पाक्षिक मराठी पत्रकारितेल ऐतिहासिक परंपरेची स्थापना करणारी घटना ठरली.मूकनायकचा पहिला अंक 31 जानेवारी 1920 रोजी मुंबई त प्रकाशित करण्यात आला. आपल्या चळवळीची भूमिका आणि आपल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी वृत्तपत्राची गरज असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आले होते त्या भूमिकेतूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक पक्षकाची सुरुवात केली. मूकनायकाची स्थापना करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुढे आर्थिक प्रश्न निर्माण झाला होता मात्र राजश्री शाहू महाराज यांनी अडीच हजार रुपयाची मदत केली होती मूकनायकाच ब्रीद वाक्य म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची निवड केली होती काय करू आता धरूनिया भीड निशंक हे तोंड वाजविले नवे जगी कोणी मुक्ती यांची जाण सार्थक लावून नवे इतर या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची निवड ब्रीदवाक्य म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक सुरू करण्यामागील वैचारिक भूमिका वृत्तपत्रासारखा समकालीन सामर्थ्यशाली माध्यम हातात असल्याशिवाय अस्पृश्य समाजाच्या दुःखांना दूर केलं जाऊ शकत नाही याचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायकाची सुरुवात केली. होती “.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर कोरडे यांनी केले याप्रसंगी पुजा कोरडे, शंकर कोरडे,संगीता कोरडे, ज्योती कुबडे, नंदीनी कुबडे, दिपाली कुबडे मारोती कुबडे, सतीशचव्हाण, नागेश चव्हाण, पवन कुबडे, आदी मान्य वरांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता..

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा