नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राधानगरी पंचायत समिती कार्यालयात बायोमॅट्रिक प्रणाली सुरू; सामजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांच्या मागणी नंतर गटविकास अधिकारी यांची कार्यवाही – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

राधानगरी पंचायत समिती कार्यालयात बायोमॅट्रिक प्रणाली सुरू; सामजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांच्या मागणी नंतर गटविकास अधिकारी यांची कार्यवाही

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राधानगरी ( दि.२६ जाने.२०२४):  अनेक शासकीय कार्यालयांमध्ये शासकीय कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने स्थानिक जनतेला वेळोवेळी संबंधित कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. काही ठिकाणी तर शासकीय कर्मचारी सतत गैरहजर असल्याचे प्रकार देखील घडत आहेत. या प्रकारची नोंद घेत राधानगरी तील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात बायोमेट्रिक प्रणालीचा अवलंब व्हावा यासाठी वेळोवेळी निवेदन दिले होते. त्याची कार्यवाही म्हणून राधानगरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ही यंत्रणा आमलात आणावी यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी परिपत्रक काढले आहे.

प. स.राधानगरी येथील बायोमेट्रिक मशीन बसवल्यानंतर चे छायाचित्र

     परंतु पंचायत समिती राधानगरी कार्यालयात देखील याच पद्धतीने बायोमेट्रिक प्रणालीचा वापर व्हावा अशी मागणी राधानगरी तालुक्यातील सामजिक कार्यकर्ते सुनील पाटील यानी गटविकास अधिकारी पंचायत समिती राधानगरी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत गटविकास अधिकारी यांनी पंचायत समिती राधानगरी येथे बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू केला आहे. या प्रणालीचा वापर सुरू होताच गट विकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष सुनील पाटील यांना संपर्क करुन याबाबत माहिती दिलीअसल्याचे सुनील पाटील यांनी सांगितले . त्यामुळे आता पंचायत समिती मध्ये शासकीय कर्मचारी वेळेत उपस्थीत राहतील त्याच बरोबर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये लवकरच बायोमेट्रिक प्रणालीचा वापर होईल असे मत सुनील पाटील यांनी व्यक्त केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा