नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त देणगी देऊन पाटील परिवारातील माजी विद्यार्थ्यांनी आजीस वाहिली अनोखी आदरांजली. – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त देणगी देऊन पाटील परिवारातील माजी विद्यार्थ्यांनी आजीस वाहिली अनोखी आदरांजली.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

सावर्डे (पा.) दि.११ जाने.२०२४:

शाळा आणि आई यांच्या ऋणातून मुक्त होणे तसे फार कठीण आहे पण हे ऋण जाणणारे देखील या भूतलावर तितकेच दुर्मिळ आहेत.परंतु राधानगरीतील सावर्डे पाटणकर या गावात याची प्रचिती पहावयास मिळाली. सावर्डे गावातील प्राथमिक शाळा म्हणजे विद्या मंदिर सावर्डे (पा.). या शाळेला यंदा तब्बल १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने शाळेचा कायापालट करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून विविध काम सुरू आहे. परंतु गावच्या या कार्यात आता पुढाकार घेऊन शाळेला दहा हजार रुपयांची देणगी देऊन याच गावातील पाटील परिवारातील माजी विद्यार्थ्यांनी एक अनोखा आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे.

आपल्या आजीच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून पाटील कुटुंबातील मुले व याच शाळेचे माजी विद्यार्थी असणारे जयश्री कुंडलिक पाटील, नवनाथ कुंडलिक पाटील, अतुल शिवाजी पाटील, शीतल शिवाजी पाटील, शुभम संभाजी पाटील, स्वाती संभाजी पाटील ,संजय कोंडिराम पाटील व कोमल सुरेश पाटील यांनी आपल्या शाळेच्या सुशोभीकरणासाठी ही देणगी देऊन दातृत्वाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. मुळातच या कुटुंबाला शैक्षणिक वारसा असल्यामुळे गावात या कुटुंबाला एक नावलौकिक लाभलेला आहे. त्या मुळेच आपल्या वाडवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलांनी ही हा वारसा पुढे चालू ठेवल्याचे दिसून आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक धोंडीराम पाटील (सर) व सर्व शिक्षक वृंद तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री संभाजी पाटील सर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते ही देणगी स्वीकारण्यात आली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा