नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , असंविधानिक रित्या गावोगावी फिरणारा सरकारी रथ त्वरित थांबवावा याबाबत भारतीय दलित महासंघाकडून शाहूवाडी तहसीलदार यांना निवेदन  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

असंविधानिक रित्या गावोगावी फिरणारा सरकारी रथ त्वरित थांबवावा याबाबत भारतीय दलित महासंघाकडून शाहूवाडी तहसीलदार यांना निवेदन 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा (दि.१८ डिसें.२०२३): 

पत्रकार -उत्तम कांबळे केनवडेकर

     दलित महासंघातर्फे  मा. तहसीलदार , शाहूवाडी यांना निवेदन देण्यात देण्यात आले.

      शाहूवाडी तालुक्यात केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारा रथ  फिरत आहे. या केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यातून लोक जागृत होतील व योजनांचा लाभ घेतील परंतु , शासकीय योजनांची माहिती पुरवणारा या रथावर असणाऱ्या बऱ्याच बाबी  बद्दल  महत्त्वाचे आक्षेप आहेत. भारतीय संविधानातील अनुच्छेद क्रमांक एक अन्वये आपल्या देशाचे नाव भारत किंवा इंडिया असे आहे. त्यानुसार आपल्या देशाचे नाव भारत सरकार किंवा इंग्रजीमध्ये गव्हर्मेंट ऑफ इंडिया असे संबोधले जाते. आणि आपल्या सर्व सरकारी दप्तरांमध्ये असाच उल्लेख आपल्याला आढळून येतो पण, योजनांची माहिती पोहोचवणाऱ्या या रथावर” मोदी सरकारची हमी “असा उल्लेख आहे. देशातील सरकार हे कोणत्याही व्यक्तीच्या नावाने सरकारी संस्थेमध्ये वापरणे ही असंविधानिक अशी कृती आहे. भारताचे सार्वभौमत्व यामुळे धोक्यात येत आहे. तसेच ही संविधानिक नियमाची उल्लंघन करणारी कृती आहे

           तसेच रथावरती वापरलेली रंगसंगती ही एका विशिष्ट पक्षाच्या ध्वजा ला मिळती जुळती अशी आहे. ती रंगसंगती भारतीय ध्वजाच्या रंग संगती सारखी असायला हवी होती. त्यामुळे या रथाला महाराष्ट्रभर विविध ठिकाणी विरोध होताना दिसत आहे. भारतीय संविधानाप्रमाणे या देशातील जनतेमध्ये जनजागृती व्हावी.

       सर्वसामान्य नागरिकांचा बुद्धिभेद करून न अमलात  आणणाऱ्या योजनांची माहिती देऊन रथाद्वारे सरकारी योजनांचा प्रचार व प्रसार न होता एका व्यक्तीचा विशिष्ट पक्षाचा प्रचार होत आहे ही घटना बाह्य बाब आहे. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. विभूती पूजा ही देशाला व संविधानाला घातक ठरणारी बाब आहे

         तरी सरकारी योजनांच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणारा हा रथ त्वरित थांबवला जावा व अपेक्षित असणारे बदल करून योजनांचा प्रचार प्रसार करावा, जेणेकरून विशिष्ट व्यक्तीचा व विशिष्ट पक्षाचा प्रचार न होता केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार व प्रसार व्हावा असे निवेदनात म्हटले आहे.

          सदरच्या निवेदनाची शासनाने संवेदनशीलरित्या दखल घ्यावी अशी मागणी शाहूवाडी चे तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी दलित महासंघाच्या प्रमुखांनी केली. निवेदन देतेवेळी श्री. दयानंद कांबळे, श्री. सिद्धार्थ बनसोडे, श्री संजय बनसोडे, श्री.अभिषेक गोसावी,श्री. मधुकर कांबळे, श्री रोहित यटम या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत इतर कार्यकर्ते ही उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा