नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भारतीय दलीत महासंघाचे जलसमाधी आंदोलन मागे: ‘तहसील प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनामुळे माघार’ – श्रीकांत कांबळे – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

भारतीय दलीत महासंघाचे जलसमाधी आंदोलन मागे: ‘तहसील प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनामुळे माघार’ – श्रीकांत कांबळे

Featured Video Play Icon
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा ( दि. १२ डिसें.२०२३): पन्हाळागडावर एका नामांकित हॉटेल प्रशासनाने शासकीय मुलकीपट जमिनीत व त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेल्या जागेमध्ये, तसेच ऐतिहासिक बुरुजावर शासनाची परवानगी न घेता पूर्णपणे बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेआहे ते काढून घेण्यासाठी भारतीय दलीत महासंघाच्या वतीने पन्हाळा तहसिलदार कार्यालयात वारंवार निवेदने देऊन देखील कार्यवाही न केल्याने सोमवार, दि. ११ रोजी भारतीय दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पन्हाळा येथील सोमेश्वर तलावात जलसमाधी आंदोलन इशारा देऊन आंदोलनाला सुरुवात केली . याची तहसील प्रशासनाने दखल घेऊन अतिक्रमण ठिकाणी पाहणी करून आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

 

तहसीलदार माधवी शिंदे,परिक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहिते, नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक चेतनकुमार माळी व पुरातत्त्व विभाग पन्हाळा यांच्या कर्मचाऱ्यांनी समक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व त्यानंतर तत्काळ बुरजावर जाण्या-येण्यासाठी वाट करून देतो व तेथील अतिक्रमण हटवण्यासाठी लागणारी सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करतो, असे लेखी आश्वासन दिल्याने जलसमाधी आंदोलन स्थगित केले असल्याचे अध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी जाहीर केले.

 

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा