नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लोकशाहीर दत्तात्रय रामा तळेकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘ही रात्र शाहीरांची’ या कार्यक्रमाचे आयोजन – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

लोकशाहीर दत्तात्रय रामा तळेकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘ही रात्र शाहीरांची’ या कार्यक्रमाचे आयोजन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 

खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा (दि.०९ डिसें.): 

पत्रकार -उत्तम कांबळे केनवडेकर.

प्राचीन मराठी साहित्यात संत, पंत आणि तंत साहित्य हे तीन प्रवाह जवळ जवळ ७०० वर्ष प्रवाहित होत आलेले आहेत.

त्यामधील लौकिक जीवनाचा पहिला उद्धार उमटला तो शाहिरी साहित्यातून. मध्यकालापासून ते आधुनिकतेपर्यंत या साहित्याने महाराष्ट्राचे सांस्कृतिक पोषण आणि रंजन केले. केवळ रंजनच नाही तर सामाजिक प्रबोधनाची व लोकशिक्षणाची मोठी परंपरा मराठी शाहिरांनी पुढे नेली. जन माणसांची पसंती आणि लोकप्रियता लाभल्यानेच शाहिरांची ओळख लोकशाहीर अशी बनली.

केनवडे ता.कागल येथील लोकशाहीर श्री दत्तात्रय रामा तळेकर यांना वयाच्या चौदाव्या वर्षापासून शाहिरी कलेचा छंद जडला तेव्हापासूनच त्यांनी त्यांचे गुरुवर्य श्रीपती वासुदेव यांच्याकडून शाहिरीचे धडे घेतले. या कलेच्या माध्यमातून त्यांनी आकाशवाणी सातारा, सांगली व कोल्हापूर केंद्रावरती आपल्या शाहिरी कलेचे सादरीकरण केले. कोल्हापूर जिल्हा बरोबरच इतर जिल्ह्यांमध्ये त्यांनी आपल्या शाहिरी कलेचे कार्यक्रम केले शाहिरी गीतांच्या स्पर्धेत अनेक ठिकाणी त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. शाहिरी कलेतून लोकप्रबोधनाची पताका खांद्यावरती घेऊन त्यांनी अनेक शाहीर घडवले.

असे हे शाहीर जवळजवळ साठ वर्ष ही शाहिरी कला व संस्कृतीचा वारसा जपत आलेले आहेत अशा या लोकशाहिरांच्या वयाच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त केनवडे येथे सोमवार दिनांक ११/ १२/२०२३ या दिवशी भैरवनाथ मंदिर केनवडे येथे ‘ हि रात्र शाहिरांची’ भव्य शाहिरांचा मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा