नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बिद्री साखर कारखान्यासाठी सावर्डे पा. मतदान केंद्रात शांततेत मतदान प्रक्रिया पार ; दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी सर्वाधिक मतदान नोंदीसाठी केले प्रयत्न  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

बिद्री साखर कारखान्यासाठी सावर्डे पा. मतदान केंद्रात शांततेत मतदान प्रक्रिया पार ; दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी सर्वाधिक मतदान नोंदीसाठी केले प्रयत्न 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा (दि.०३ डिसें.) :

बिद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली असून या मतदान प्रक्रियेसाठी १७३ मतदान केंद्राचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच मतदान केंद्रावर दोन्ही आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच मतदानाची नोंद केली असून राधानगरी तील सावर्डे पा. या गावातील मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

ही मतदान प्रक्रिया गावातील प्राथमिक शाळेत पार पडली असून या मतदान प्रक्रियेसाठी दोन मतदान केंद्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सावर्डे पा. , कासारवाडा पा. व ढेंगेवाडी या गावांचा समावेश होता. त्यापैकी केंद्र क्र. १८ वर झालेल्या मतदानात ४२५ मतदानापैकी ३८७ मतदानाची नोंद झाली.यामध्ये सकाळी १० ते १२ या वेळेत १०० मतदान नोंदवले गेले तर दुपारच्या सत्रात १२० मतदानाची नोंद झाली व दुपारी २ते ५ या वेळेत १६७ मतदान नोंद झाले. असे एकूण ३८७ मतदान नोंदवले गेले.

तर याच गावातील मतदान केंद्र क्र. १९ वर एकूण ४०४ मतदानापैकी ३६७ मतदानाची नोंद झाली. यामध्ये सकाळी १० ते १२ या वेळेत २५५ मतदान नोंदवले गेले तर दुपारच्या सत्रात ७० मतदानाची नोंद झाली व दुपारी २ते ५ या वेळेत ४२ मतदान नोंद झाले. असे एकूण ३८७ मतदान नोंदवले गेले.

दोन्हीही केंद्रांवर सकाळच्या वेळेस मोठी गर्दी होताना दिसत असून त्यानंतर हळुहळू ही गर्दी कमी होत गेली. अखेर केंद्र क्र. १८ वर ९१.०६ % मतदानाची नोंद झाली तर केंद्र क्र. १९ वर ९०.८४% मतदान नोंद झाले.

 

 

 

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा