नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बिद्री कारखान्यासाठी चुरशीने मतदान ; १७३ मतदान केंद्रावर एकूण ८९.०३ टक्के मतदान  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

बिद्री कारखान्यासाठी चुरशीने मतदान ; १७३ मतदान केंद्रावर एकूण ८९.०३ टक्के मतदान 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा (दि.०३ डिसें.) :

            कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील लक्ष वेधून घेणारा भाग म्हणजे बिद्री सहकारी साखर कारखाना. या कारखान्याच्या निवडणुकीत दर वेळीच राजकीय उहापोह  होतो. त्यामुळे  कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष याकडे वेधलेले असते.  ३डिसेंबर , रविवार रोजी बिद्री कारखान्याचे मतदान पार पडले .या  निवडणुकीसाठी कारखाना कार्यक्षेत्रातील राधानगरी, भुदरगड, कागल व करवीर तालुक्यात १७३ मतदान केंद्रांवर हे मतदान  पार पडले असून दोन्ही आघाड्यांतील प्रत्येकी २५ आणि सहा अपक्षांसह ५६ उमेदवारांचे राजकीय भवितव्य पेटीबंद झाले.या मतदानासाठी 56 हजार 91 मतदारांपैकी 49 हजार 940 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बोरवडे, मजरे कासारवाडा, मुरगूड येथे किरकोळ वादावादी वगळता बाकी सर्व ठिकाणी हे मतदान शांततेत पार पडले.

         यंदाच्या निवडणुकीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, अध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजय घाटगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या विरोधात खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, समरजितसिंह घाटगे, जनता दलाचे विठ्ठलराव खोराटे व भाजपचे नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी असून प्रत्येक मतदान केंद्रावर दोन्हीही आघाडीच्या कार्यकर्त्यांनी  चुरशीने मतदान नोंदवले.

   सायंकाळी चारनंतर मतदान आटोक्यात आल्यामुळे सर्वत्र मतदान केंद्रावर गर्दी कमी झाली होती. सकाळपासून उत्साही असणारे कार्यकर्ते हे बूथमंडपात विसावले होते. मतदार यादीवरून नजर फिरवत मतदानाचे कोणी राहिले आहे का? ते पाहात होते. राहिले असल्यास खास गाडी पाठवून मतदानास आणले जात होते. दिवसभर झालेल्या मतदानाची आकडेवारी घेत कुठे वाढणार, कुठे कमी पडणार याबाबतही चर्चा होत होती. ही आकडेवारी नेत्यांपर्यंत पोहोचवली जात होती.  शेवटी मतदान पेट्या रवाना झाल्या अन् कार्यकर्त्यांना हायसे वाटले.

 राधानगरी तालुक्यातील मतदान केंद्रातील आकडेवारी खालीलप्रमाणे :


Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा