नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , संविधान दिनाचे औचित्य साधून राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथे कायदा प्रेमींचे राज्यस्तरीय संमेलन संपन्न – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

संविधान दिनाचे औचित्य साधून राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथे कायदा प्रेमींचे राज्यस्तरीय संमेलन संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पत्रकार -उत्तम कांबळे केनवडेकर(दि.२६ नोव्हे.) :

महाराष्ट्रातील भ्रष्टाचार विरोधी लढा देणारे व भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राची स्वप्न पाहणाऱ्या कायदा प्रेमींसाठी 26 नोव्हेंबर या संविधान दिनाचे औचित्य साधून माहिती अधिकार कायदा याविषयी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून कायदा प्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.

कार्यक्रमाचे दीप प्रज्जवलन करताना उपस्थित मान्यवर

या कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन व दीप प्रज्वलनाने झाली. प्रमुख वक्ते मा. गणेश शिंदे, मा. प्रकाश उघडे, मा.बाजीराव पाटील. कोल्हापूर, मा.अमोल पाटील,मा. शाहीन शेख. यांनी अनमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा माहिती समन्वयक मा.आनंदा शिंदे होते.

संमेलनाची सुरुवात संविधानाची उद्देशिका वाचून करण्यात आली.

या कार्यक्रमांमध्ये मा. प्रकाश उघडे सर यांनी माहिती अधिकार कलम 4 ख व व इतर महत्त्वाच्या कलमावर विस्तृत चर्चा करत मार्गदर्शन केले. माहिती अधिकार कार्यकर्ता कसा घडतो व त्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते यासंबंधी मा. बाजीराव पाटील कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले. गणेश शिंदे सर यांनी आरटीआय कार्यकर्त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे समाधान केले ,मा. शाहीन शेख सर यांनी कायदा प्रेमींचे मनोरंजन करत माहिती अधिकाराविषयी मार्गदर्शन केले.

संमेलनात कायद्याचे मार्गदर्शन घेताना उपस्थित जनसमूह

यावेळी राधानगरीतील नरतवडे गावच्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा मगदूम यांनी सामाजिक कार्याविषयी मार्गदर्शन केले. मा. अतुल पाटील व मा. सुनील पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संमेलनाची नियोजन केले त्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. कोल्हापूर जिल्ह्यामधून आलेल्या सर्व कायदा प्रेमींनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले.

कायदा विषयक मार्गदर्शकां समवेत कायदा प्रेमी

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा