नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्रगतशील युवा शेतकरी श्री रमेश शामराव कांबळे यांनी पिकविला तब्बल तीन फुट लांबीचा दुधी भोपळा ; राधानगरीतील धामोड पैकी नऊ नंबर येथील प्रगतशील शेतकरी रमेश कांबळे – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

प्रगतशील युवा शेतकरी श्री रमेश शामराव कांबळे यांनी पिकविला तब्बल तीन फुट लांबीचा दुधी भोपळा ; राधानगरीतील धामोड पैकी नऊ नंबर येथील प्रगतशील शेतकरी रमेश कांबळे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 

पत्रकार -उत्तम कांबळे केनवडेकर /लाईव्ह प्रज्ञावंत

धामोड पैकी नऊ नंबर येथील प्रगतशील युवा शेतकरी श्री रमेश शामराव कांबळे यांनी आपल्या शेतामध्ये नियोजनबद्ध दुधी भोपळ्याची लागवड केली . मेहनत व योग्य नियोजन यांच्या जोरावर त्यांनी आपल्या शेतामध्ये तब्बल तीन फुटापर्यंत लांबी असणारे दुधी भोपळ्याचे उत्पादन घेतले आहे.

भोपळ्याची भाजी आपल्यापैकी अनेकांना आवडत नाही. पण तुम्हाला हे माहित आहे का? दुधी खाण्याचे अनेक फायदे आहे. तसेच दुधी भोपळा व त्याचा रस प्यायल्याने अनेक फायदे होतात. थंडीच्या दिवसात दुधी भोपळ्याचा रस आपल्याला खूप फायदेशीर असतो. त्यामध्ये १२% पाण्याचे प्रमाण असते. दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने वाढते वजन, उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक आजारापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त असतो.

 

दुधी भोपळ्याचे रस पिण्याचे फायदे

 

जर आपण वाढत्या वजनामुळे त्रासले असाल तर अनेकजण व्यायाम करत असतात पण त्याचबरोबर आपण आपल्या खाण्याकडे पण लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच नियमित दुधी भोपळ्याचा रस प्या. त्यामुळे खूप वेळ आपले पोट भरल्यासारखे राहते आणि भूकपण जास्त लागत नाही. त्यामुळे आपले वाढते वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

 

जर तुम्ही नियमित दुधी भोपळ्याचे रस पित असाल तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर ती नियंत्रित राहण्यासाठी मदत करते. २०० ग्राम दुधी भोपळ्याचे रस प्यायल्याने रक्तातील कोलेस्ट्रोल प्रमाण कमी होते. त्यामुळे नेहमीच्या आहारामध्ये दुधीच्या रसाचे समावेश करा.

दुधी भोपळ्याचे रस आपल्या शरीराला थंड ठेवण्यासाठी मदत करत असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अधिक प्रमाणत दुधीचे सेवन केले जाते. तुम्हाला लघवी करताना जळजळ होत असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये दुधी भोपळ्याचा रसाचे समावेश केला.

 

नेहमीच आपण केसांच्या गळतीमुळे त्रासले आहोत. त्यावर उपाय म्हणून तुम्ही दुधी भोपळ्याचा रस पिऊ शकता. तसेच आवळ्याच्या रसामध्ये दुधी भोपळ्याचे रस मिक्स करून त्यानंतर ते प्यायलाने केसातील कोंडा कमी होण्यासाठी मदत होते.

लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, हृदय, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे. दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याकारणाने तो हृदयरोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा