नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गडहिंग्लज येथे ,’प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने’चा जिल्ह्यातील पहिला कॅम्प . ‘समरजितसिंह आपल्या दारी’ या अभियानांतर्गत हा कॅम्प घेण्यात आला. – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

गडहिंग्लज येथे ,’प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने’चा जिल्ह्यातील पहिला कॅम्प . ‘समरजितसिंह आपल्या दारी’ या अभियानांतर्गत हा कॅम्प घेण्यात आला.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 गडहिंग्लज ,दि.१९ नोव्हे.२०२३:

देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीं यांनी सुरु केलेल्या ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने’चा जिल्ह्यातील पहिला कॅम्प गडहिंग्लज येथे पार पडला. ‘समरजितसिंह आपल्या दारी’ या अभियानांतर्गत हा कॅम्प घेण्यात आला. १३९६ लाभार्थ्यांनी यावेळी नोंदणी केली.

 

बारा बलुतेदारांना व्यवसायिक प्रशिक्षण व व्यवसायाच्या आर्थिक मदतीसाठी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम या योजनेचा कॅम्प आयोजित करण्यात आला.

 

सहकारमहर्षी स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त ‘समरजितसिंह आपल्या दारी’ अभियानांतर्गत शासकीय योजनांचे लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे व साहित्याचे वाटप याठिकाणी करण्यात आले.

 

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी आणि कॅबिनेट मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करुन आणला जाईल. कागल विधानसभा मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे. शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ देताना गेल्या पंधरा वर्षांपासून सुरु असलेली एजंटगिरी मोडून काढली जाईल. स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाश्वत विकास कामाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. हीच परंपरा अविरतपणे सुरु ठेवीन, अशी ग्वाही यावेळी उपस्थितांना दिली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा