नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , संपादकीय लेख – वंचित बहुजन आघाडीचे वेगळेपणं…!!     – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

संपादकीय लेख – वंचित बहुजन आघाडीचे वेगळेपणं…!!    

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 

राजकारणात पैसा असेल तरच निवडणूक लढविता येते आणि विजयी होता येते असा पक्का समज प्रस्थापित राजकीय पक्षांनी जनतेच्या मनात रुजविला आहे…!!

गेल्या ७३ वर्षातील निवडणुकीच्या अनुभवातून प्रस्थापित राजकीय पक्षांनी पैशांचा वारेमाप वापर करून,अनैतिक बाबींचा अवलंब करीत,अपप्रवृत्तींना चालना देऊन तसा नॅरेटीव सेट केला आणि गरीब माणसांना निवडणूक लढण्यापासुन बाद करण्याचा कुटील डाव खेळला. त्याचा परिणाम असा झाला की, तमाम गरीब समुह आपोआप निवडणुकीच्या रिंगणातून बाद झाला आहे.म्हणजे गरीबांचा लोकप्रतिनिधी होण्याचा मार्ग थांबवला गेला आहे.ही मुठभर श्रीमंत वर्गाने गरीब समुहा विरुद्धचे रचलेले षढयंत्र आहे….!!

अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील वंचित बहुजन आघाडी अशा “समजुतीला” आव्हान देतं गरीबांच्या हिताचं राजकारण करतेय हे वंचित बहुजन आघाडीचं वेगळेपणं प्रत्येक मतदाराने आणि ९०% गरीब समुहाने समजून घेतले पाहिजे…!!

त्यासाठी मी ऊदाहरणांसह वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीचे ऐतिहासिक दाखले मांडतोय…!!

१९९२-९३ साली नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारिप बहुजन महासंघाने आदिवासी समाजातील भिमराव केराम या अतिशय गरीब चहा टपरी चालविणा-या तरुणाला विधानसभेचे तिकीट दिले आणि निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी आठवडी बाजारात कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून भिमराव केराम यांना निवडून आणले आमदार बनविले. विशेष बाब म्हणजे भिमराव केराम यांच्या विरोधात कॉंग्रेस पक्षाचा माजी मंत्री उमेदवार होता तो गडगंज श्रीमंत होता त्याचा पराभव झाला आणि गरीब आदिवासी तरुण जिंकला, गरीबांचा माणूस सुद्धा आमदार होऊ शकतो हे भारिप बहुजन महासंघाने ऊदाहरण घालून दिले. आणि गरीब कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढविला…!!

१९९९ साली विधानसभेच्या निवडणुकीत अकोट विधानसभा मतदारसंघात अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघाचे तिकीट बारी समाजातील रामदास बोडखे या अतिशय गरीब छोट्या ओबीसी बांधवांला दिले, निवडणूक खर्चासाठी वर्गणी करुन पैसे दिले आणि निवडून आणले, ते आमदार आणि लगेच रोजगार हमी राज्यमंत्री झाले. छोट्या ओबीसी समुहातील गरीब माणूस निवडून येऊ शकतो आणि मंत्री सुद्धा होऊ शकतो हे उदाहरण वंचित बहुजन आघाडीने घालून दिले…!!

माळी समाजातील अतिशय गरीब कुटुंबातील बळीराम सिरस्कार जिल्हा परिषद अध्यक्ष आणि दोन वेळा आमदार होऊ शकतो हेही वंचित बहुजन आघाडीने सिद्ध करुन दाखविले आहे…!!

मुस्लिम समाजातील कासार जातीच्या अतिशय गरीब कुटुंबातील सौ. साबिया अंजुम सौदागर या महिलेला जिल्हा परिषदेचे तिकीट देणे, निवडून आणणे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष बनविणे, लाल दिव्याच्या गाडीत बसविणे हा वंचित बहुजन आघाडीचा इतिहास आहे…!!

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील बाभूळगाव पंचायत समिती गणात पाथरवट समाजाच्या भटक्या विमुक्त जमाती मधील अतिशय गरीब कुटुंबातील सौ. कविता ताई ढाळे यांना बाळासाहेब आंबेडकर यांनी तिकीट दिले, जिल्हा परिषद उमेदवाराला त्यांच्या निवडणुकीचा पुर्ण खर्च करायला सांगितला सौ. कविता ताई ढाळे या निवडून आल्या आणि पातूर पंचायत समितीच्या उपसभापती झाल्या…!!

बौद्ध समाजातील अतिशय गरीब कुटुंबातील सौ. ज्योत्स्ना ताई गवई यांना तिकीट देणे निवडून आल्यानंतर अकोला महानगरपालिकेचे महापौर बनविणे आणि लाल दिव्याच्या गाडीत बसविण्याचा हा ऐतिहासिक दाखला भारिप बहुजन महासंघाच्या नावांवर आहे…!!

वंचित बहुजन आघाडीने २०२२ ला अकोट तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायत मध्ये अतिशय गरीब उमेदवाराला सरपंच पदाचा उमेदवार बनविले, त्याला निवडून आणले आणि फाटक्या माणसांचे राजकारण जिवंत असल्याचे श्रीमंतांना ठणकावून सांगितले…!!

अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या चाळीस वर्षांत अशा अनेक जणांना, छोट्या ओबीसी,आदिवाशी, भटके विमुक्त,मुस्लिम, बौद्ध तथा सर्वच समाज घटकांना संधी देऊन त्यांच्या जीवनाचे सोने केले आहे. म्हणून कार्यकर्ते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांना “परिस” या उपाधीने संबोधतात….!!

वरील ऊदाहरणे प्रातिनिधिक स्वरुपात दिली आहेत, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, आमदार, सभापती, उपसभापती, सरपंच अशा प्रत्येक सत्तेच्या खुर्चीत वंचित बहुजन आघाडीने गरीबांचा लोकप्रतिनिधी निवडून आणला आहे, आणि मुठभर श्रीमंताना संकेत दिला आहे की, खबरदार तुम्ही श्रीमंतीचा कितीही माज केला तरीही मी गरीबांचे राजकारण संपु देणार नाही…!!

अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचा राजकीय प्रवास ४० वर्षाचा आहे. त्यांनी आपल्या राजकारणातील मंत्री पदांचा त्याग करुन गरीबांच्या ताटात सत्तेचे दान टाकले आहे.त्यासाठी अतिशय कष्ट घेतले आहेत आणि

फाटक्या माणसांचे राजकारण जीवंत ठेवले आहे,हा ४० वर्षाचा इतिहास लक्षात घेऊन, ९०% संख्या असलेल्या गरीब जनतेने देशाची सत्ता ताब्यात घेण्यासाठी मनाची तयारी केली पाहिजे…!!

अर्थात गरीबांनी सत्ताधारी मानसिकता विकसित केली पाहिजे, मीही सत्ताधारी होऊ शकतो हा आत्मविश्वास मनात रुजविला पाहिजे आणि मुठभर श्रीमंताना ठणकावून सांगितले पाहिजे की, आम्ही इथले राजे होणार आहोत…!!

अॅड बाळासाहेब आंबेडकर यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील “रयतेचे राज्य” निर्माण करावयाचे आहे…!!

छत्रपती शिवाजी महाराजांनी क्षत्रियांना सोबतं घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले नाही तर मावळ्यांच्या हातात तलवार देऊन रयतेचे राज्य ऊभे केले अगदी त्याच प्रकारे अॅड बाळासाहेब आंबेडकर यांना, गरीब मराठे, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक, भटके विमुक्त मुस्लिम सर्वांना सोबतं घेऊन लोकशाहीचे सामाजिकीकरण करावयाचे आहे…!!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना ४०० वर्षानंतर मुर्तरुप देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा नातू अॅड बाळासाहेब आंबेडकर गेली ४० वर्षे पायाला भिंगरी बांधून भटकंती करतोय,झटतो आहे हे वेगळेपण तमाम महाराष्ट्रातील जनतेने समजून घ्यावे हीच अपेक्षा….!

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा