नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शेंडुर ,ता.कागल मध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त धनगर बांधवाकडून मेंढी पूजन      – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

शेंडुर ,ता.कागल मध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त धनगर बांधवाकडून मेंढी पूजन     

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पत्रकार -उत्तम कांबळे केनवडेकर (दि.१४ नोव्हे.२०२३)

सालाबाद प्रमाणे या वर्षी दिवाळी पाडव्या दिवशी धनगर बांधव आपल्या मेंढीचे पूजन करत असतो शेंडुर येथील हालसिद्धनाथ मंदिराच्या समोर मेंढीपूजन केले जाते, फार पूर्वीपासून चालत आलेली ही पारंपारिक संस्कृती धनगर बांधवानी टिकवून ठेवली आहे .

जशी शेतकऱ्याची शेती तशी धनगराची मेंढी दोघांनाही आयुष्यात सक्षमपणे उभा करणारी ही दौलत दोघांनाही प्रिय आहे दरवर्षीप्रमाणे शेंडूर मध्ये सर्व धनगर बांधव आपल्या मेंढ्यांचे कळप घेऊन मंदिरासमोर येतात, भक्तीभावाने मेंढीचे पूजन केले जाते, त्यांना वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालून सजवले जाते, हळद-कुंकू लावून त्यांना आंबील -गोड्यांचा नैवेद्य दाखवला जातो तसेच त्यांची पूजा केली जाते.

धनगरी बांधव आपल्या मेंढीसाठी अहोरात्र काबाडकष्ट करत असतो त्यांना पोटभर अन्न मिळवण्यासाठी आज या बांधावर तर उद्या त्या बांधावर भटकत असतो. मेंढपाळाचा आणि शेतकऱ्याचा संबंध खूप जवळच आहे शेती पिकवण्यासाठी आपल्या शेतात तो बकरी बसवतो तसेच मेंढरांना चारा मिळण्यासाठी तो शेतकऱ्याच्या राणामाळात फिरत असतो.

या मेंढीपूजनाच्या कार्यक्रमात गावातील संपूर्ण धनगर बांधव एकत्रित येऊन आनंदमय वातावरणात कार्यक्रम पार पडला

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा