नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , साके ता. कागल येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या तालुक्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

साके ता. कागल येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या तालुक्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पत्रकार -उत्तम कांबळे केनवडेकर

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष: आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखालील कागल तालुका भारतीय बौध्द महासभेच्या तालुक्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन साके येथील बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आले . यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांचे प्रतिमा पूजन करण्यात आले . त्यानंतर सामुदायिक त्रिशरण व पंचशील घेण्यात आले .

 

भारतीय बौद्ध महासभा शाखाचे उद्घाटन ब्राईट आर्मीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दयानंद म्हेतर सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आदरणीय अनिल सिद्धेश्वर , बेळगांव जिल्हा कार्याध्यक्ष महेश धम्मरक्षित सर ,जिल्हा सचिव अमर व्हनाळीकर व सर्व कागल तालुका पदाधीकारी व उपाध्यक्ष यशवंत कांबळे तसेच साके येथील बौध्द समाजातील उपासक- उपासिका मोठ्या संख्येने हजर होते

यावेळी मान्यवरांना गावातून वाजत गाजत कार्यक्रमाच्या ठिकाणी पर्यंत आणले . रस्त्याच्या दोन्हीं बाजुस रांगोळी व फुलांनी सजावट केली होती . सर्वांनी दिलेल्या जय भीम घ्या घोषणेने संपूर्ण वातावरण आनंदीमय झाले होते .

यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाखाध्यक्ष आयु. कृष्णात शीलावंत यांनी केले तर भारतीय बौद्ध महासभा चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या कार्याविषयी कागल तालुक्यात भारतीय बौध्द महासभा यांचे वतीने गेली दिड वर्षा पासून हाती घेतलेल्या कामाचा आढावा कागल तालुका अध्यक्ष आयु .साताप्पा कांबळे यानी घेतला . यावेळी बेळगाव जिल्हा कार्याध्यक्ष आदरणीय महेश धमरक्षित सर यांनी भारतीय बौध्द महासभेचे दहा उद्दिष्ट यांची माहिती देऊन आपण सर्वांनी संघटीत होणे गरजेचे आहे असे सांगितले .जिल्हा अध्यक्ष अनिल सिद्धेश्वर यानी आद. राजरत्न आंबेडकर साहेबांना आपण सर्वांनी साथ सहयोग देणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष. आयु .दयानंद म्हेतर सर यानी महापुरुषांच्या कार्या विषयी सविस्तर माहिती देऊन बुद्धाच्यां आष्टांग मार्गा विषयी सविस्तर माहिती दिली. उतम कांबळे साकेकर व माजी सैनिक सी .बी .कांबळे। यानी साके येथील सामाजीक चळवळीतील योगदान याची माहिती दिली.

यावेळी माजी.जिप सदस्य आयु. हिंदूराव कांबळे सर ,कागल तालुका भारतीय महासचिव हिरामणी कांबळे सर, संघटक अनिल कांबळे सरपंच सुरुपली, संघटक निवास कांबळे सांगाव, दत्ता कांबळे कुरुकली, बाळासाहेब कांबळे , सरदार कांबळे बाबासाहेब कांबळे , अशोक कांबळे लिंगनुर ,समता सैनिक दल प्रमुख आयु.नागेश कांबळे व्हनाळीकर ,बौध्दाचार्य सिद्धार्थ कांबळे , ब्राईट आर्मी जिल्हा अध्यक्ष समीर घारे , शंकर नरके आनुर .तसेच साके येथील कोल्हापूर बाजार समितीचे संचालक मा.नानासो कांबळे ,पत्रकार सरदेसाई ,रमेश कांबळे सर, डी एम कांबळे सर, शाखा उपाध्यक्ष धुळापा कांबळे ,महासचिव मा. बळवंतराव साकेकर ,कार्याध्यक्ष श्रावण कांबळे , सातापा कांबळे( ड्रायवर) ,युवराज कांबळे सर, महेश कांबळे सर ,सुदर्शन कांबळे , व बौध्द समाजातील सर्व नागरिक तरुण मित्र मोठ्या संख्येने हजर होते .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा