नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अग्रणी सोशल फौंडेशन, विटा – कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धन संघ कोल्हापूर आणि सम्यक सम्बोधी ग्रुप एतवडे||बु|| यांच्या संयुक्त विद्यमाने विविध गावात विद्यार्थी दिवस मोठ्या उत्साहात साजरा – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

अग्रणी सोशल फौंडेशन, विटा – कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धन संघ कोल्हापूर आणि सम्यक सम्बोधी ग्रुप एतवडे||बु|| यांच्या संयुक्त विद्यमाने विविध गावात विद्यार्थी दिवस मोठ्या उत्साहात साजरा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 

सांगली प्रतिनिधी , दि.८ नोव्हें.२०२३: ‘ शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे जो कोणी प्राशन करेल तो गुर गुरल्याशिवय राहणार नाही ‘ हे वाक्य आहे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे. ज्या शिक्षणाच्या बळावर त्यांनी समाजात न्याय, स्वतंत्र , समता व बंधुता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्याच महामानवाच्या शाळेचा पहिला दिवस म्हणजे ७ नोव्हेंबर. सातारा जिल्ह्यातील छ. प्रतापसिंह हायस्कूल मध्येप्रवेश घेऊन आपल्या शैक्षणिक वाटचालीस सुरुवात केली तो दिवस . संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो.

याच दिवसाचे महत्त्व जाणून सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एतवडे, चिकुर्डे, करंजवडे या गावांमध्ये अग्रणी सोशल फौंडेशन, विटा – कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धन संघ कोल्हापूर आणि सम्यक सम्बोधी ग्रुप एतवडे||बु|| यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात पार पडला. चिकुर्डे येथे मंदा सोनताटे ,कासार मॅडम ,पवार मॅडम, मलगुंडे सर ( मुख्याध्यापक)सिद्धांत सर शेणेकर सर, यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम पार पडला तर ऐतवडे येथे राजेश कांबळे ,करंजवड़े येथे हरिष कांबळे, सव्वाशे सर, राठौड़ सर, चेंडके सर यांनी संबंधित विषयावर मार्गदर्शन करत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जी जगात अभुतपुर्व क्रांती घडवली.त्यास याच दिवशी सुरूवात झाली होती. असे उद्गार काढले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा