नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गाडीचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात सरवडेतील तरुणाचा मृत्यू – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

गाडीचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात सरवडेतील तरुणाचा मृत्यू

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

सरवडे (दिनांक:२१ ऑक्टो.२०२३): निपाणी – फोंडा राज्यमार्गावरील सरवडे येथील दूधगंगा नदी पुलावर ताबा सुटल्याने मोटरसायकल कठड्याला धडकली. या अपघातात गंभीर जखमी जालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.ही घटना गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. रितेश अमरसिंह पाटील (वय २१, रा. सरवडे, ता. राधानगरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, रितेश पाटील आपल्या मित्रांकडे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सरवडे येथून दुधगंगा नदीपुलावरून राधानगरीकडे जात होता. पुलावर आल्यानंतर त्याचा ताबा सुटल्याने दुचाकी पुलाच्या लोखंडी कठड्याला धडकली. त्यात तो गंभीर जखमी झाला. तत्काळ त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

बिद्रीचे संचालक राजेंद्र पाटील आणि उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांचे रितेश पुतणे तर उपसरपंच अमरसिंह पाटील व राधानगरी पं.स.च्या सभापती कविता अमर पाटील यांचा तो मुलगा होत. त्याच्या मागे मोठा परिवार आहे. रितेश डीग्रीच्या तिसऱ्या वर्षात पुणे येथे शिक्षण घेत होता. नवरात्रोत्सवानिमित्त सुट्टी असल्याने तो गावी आला होता. मनमिळावू स्वभावाचा असल्याने गावात त्याचा मोठा मित्र परिवार होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुपारपर्यंत व्यापारी व ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून श्रध्दांजली वाहिली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा