नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोळवण गावातील तरुणाची आत्महत्या ; घराजवळील शेतात फास लावून संपविली जीवनयात्रा  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

कोळवण गावातील तरुणाची आत्महत्या ; घराजवळील शेतात फास लावून संपविली जीवनयात्रा 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

प्रज्ञावंत वृत्तसेवा: दि. १० ऑक्टो.२०२३

       भुदरगड तालुक्यातील कोळवण या गावातील एका तरुणाने रविवारी आपल्या राहत्या घराजवळील शेतात फास लावून आपली जीवन यात्रा संपवली.

गौतम आनंदा कांबळे वय २७  रा. कोळवण ता. भुदरगड  असे त्या तरुणानचे नाव असून आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

     याबाबत मिळालेली माहिती अशी, गौतम कांबळे हा तरुण  आपले  वयोवृध्द आई वडील व पत्नीसह  कोळवण या गावी राहत होता कुटुंबाची जबाबदारी त्याच्या वर असल्याने गारगोटी गावात तो कामानिमित्त ये – जा करायचा. आठवड्यातील रविवारी सुट्टी असल्याने तो घरी असायचा. या रविवारी तो घरातच होता; परंतु रविवारी  सायंकाळच्या सुमारास  त्याचा मृत्यूदेह  घराजवळील एका शेतातील झाडाला लटकलेला पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सगळ्यांशी हसतमुख असणारा गौतम हे असे काही करेल  याची कोणी कल्पना ही केली न्हवती.

    ही बातमी समजताच पोलिसांनी घटनास्थळी हजर राहून घटनेची नोंद घेतली. त्यानंतर मृतदेह  ग्रामीण रुग्णालय गारगोटी येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्यावेळी त्याने फास लावण्यापूर्वी थिमेट सारखा विषारी पदार्थ  खाल्याचे निदर्शनास आले तसेच आत्महत्येचे कारण समजू शकले नाही असे मत गारगोटी पोलीस स्टेशन च्या महिला पोलीस नाईक पी. टी.मुल्ला यांनी सांगितले.

       गौतम च्या पश्चात त्याची पत्नी, आई – वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.  त्याच्या या कृत्यामुळे समाजातून हळहळ व्यक्त होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा