नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , फुले-शाहू-आंबेडकर विचार समितीचे जिल्हाधिका-यांना निवेदन ; जातीय विषमतेतून बहूजनांवर होणारे अन्याय रोखण्यासाठी केले आवाहन – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

फुले-शाहू-आंबेडकर विचार समितीचे जिल्हाधिका-यांना निवेदन ; जातीय विषमतेतून बहूजनांवर होणारे अन्याय रोखण्यासाठी केले आवाहन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

­कोल्हापूर दि. ०३ ऑक्टो.२०२३:

      देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे लोटली तरी मागासवर्गीय बौद्ध आदिवासी ओबीसी व भटक्या विमुक्त जमाती या बहुसंख्य समूहावर सामाजिक विषमतेतून व जातीय मानसिकतेतून अन्याय अत्याचार वाढत आहेत. ही लाजिरवाणी व मानवतेला काळीमा फासणारी बाब आहे. याचा निशेध करण्यासाठी कोल्हापूरातील शिव-पाहू- फुले-आंबेडकर या विचार सरणीवर अधारित अन्याय अत्याचार निवारण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत


बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हार अर्पण करताना जो. शा. बा. संघटनेचे कार्यकर्ते.

देशतील अशा घटनांचा निषेध जाहीर करत उपजिल्हाधिका-यांना आज निवेदन दिले. यावेळी बोलताना आर. बी. कोसंबी म्हणाले, आपल्या महाराष्ट्रातच 2018 ते करण्याचा इषारा दिला. 2023 पर्यंत 16163 गुन्हे अँटोसिटी कायद्याअंतर्गत नोंद आहे. बौद्ध, चर्मकार, मातंग, आदिवासी याच्या खुनांची संख्या 2010 ते 2022 पर्यंत 632 इतकी आहे. तरी देखील शासनाने


मोर्चात सहभागी झालेला महिला वर्ग

काही केले नाही. सरकारला जाग यावी यासाठी आम्ही हा मोर्चा आयोजित केला असल्याचे मत व्यक्त केले. या

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करताना जो. शा. बा. संघटनेचे कार्यकर्ते

हा मोर्चा बिंदुचौकातून सुरू होउन थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येउन पोहचला. या मोर्चात कोल्हापूर जिल्हयातील बेलवळे, जैताळ, कागल, सावर्डे पा.,तुरंबे यावर कासारवाडा यासांरख्या अनेक गावातून बहुसंख्य लोकांचा जनसमूह एकजूट झालेला होता.


मोर्चात सहभागी झालेला जनसमुदाय

निवेदनानंतर जर सरकाराने काहीच निर्णय घेतला नाही तर पुन्हा येत्या 15 नोव्हेंबरला आपण पुन्हा मोठे आंदोलनकरण्याचा इशारा दिला.

हा मोर्चा बिंदुचौकातून सुरू होउन थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येउन पोहचला. या मोर्चात कोल्हापूर जिल्हयातील बेलवळे, जैताळ, कागल, सावर्डे पा. तुरंबे -कासारवाडा यासांरख्या अनेक गावातून बहुसंख्य लोकांचा जनसमूह एकजूट झालेला होता.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा