नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नेहरू युवा केंद्र कोल्हापूर व ग्रा. पं.सावर्डे पा. यांच्या संयुक्त विद्यमानाने गावात स्वच्छता अभियाांतर्गत एक तास श्रमदान – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

नेहरू युवा केंद्र कोल्हापूर व ग्रा. पं.सावर्डे पा. यांच्या संयुक्त विद्यमानाने गावात स्वच्छता अभियाांतर्गत एक तास श्रमदान

विद्यार्थी तसेच लोकसहभागातून ग्रामदैवत केदार्लिंग देवालयाच्या परिसरातील केलेली स्वचछता

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 सावर्डे पा. दि. १ ऑक्टो.२०२३

     २ ऑक्टोबर २०१४ रोजी राजघाट, नवी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत अभियान सुरू झाले. या वर्षी महात्मा गांधी यांच्या १५४ व्या जयंती निमित्त स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास’ या रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल बनवुयात असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं.


स्वचछता अभियानात प्रत्यक्ष सहभाग झालेले ग्रामपंचायत सरपंच, डे.सरपंच ,सचिव , सदस्य व युवा समन्वयक गौरव पाटील


 

‘याच अभियानाचा भाग म्हणून राधानगरीतील सावर्डे पाटणकर या गावी नेहरू युवा केंद्र कोल्हापूर व ग्रामपंचायत सावर्डे पाटणकर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम सावर्डे पा. गावातील प्राथमिक शाळा परिसर व गावचे ग्रामदैवत केदारर्लिंग देवालयाच्या परिसराची स्वच्छता करून साजरा करण्यात आला.

विद्यार्थी व लोकसहभागातून शाळेच्या परिसरातील केलेली स्वचछता.

 हे अभियान नेहरू युवा केंद्राचे राधानगरी तालुका समन्वयक गौरव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून यामध्ये गावच्या सरपंच श्रीम. सुमन मोरे, डे. सरपंच सुरेश परीट ,ग्रामसेविका समिधा पाटील तसेच सदस्य वसंत शेंडगे, सदस्या वंदना गुरव यांच्या समवेत गावातील नागरिक देखील सहभागी झाले होते. त्याच बरोबर विद्या मंदिर सावर्डे पा. व शिवाजीराव खोराटे विद्यालय भागशाळा सावर्डे पा. मधील शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी यांनी देखील या अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा