नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कामाचा मोबदला न मिळाल्याने समाज मंदिराच्या स्लायडिंग खिडक्या केल्या गायब ;सावर्डे पा. मधील धक्कादायक प्रकार – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

कामाचा मोबदला न मिळाल्याने समाज मंदिराच्या स्लायडिंग खिडक्या केल्या गायब ;सावर्डे पा. मधील धक्कादायक प्रकार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

सावर्डे पा.( दि. १६ सप्टें. २०२३):  राधानगरी तील सावर्डे पाटणकर गावात मागासर्गीय समाजातील असलेल्या समाज मंदिराच्या स्ल्यायडिंग खिडक्या गायब केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. समाजमंदिराच्या केलेल्या कामाचा मोबदला ग्रामपंचायतीकडून न मिळाल्याने हा प्रकार केल्याचे लक्षात आले आहे.

समाज मंदिराच्या उघड्या पडलेल्या खिडक्या

याबाबत मिळालेली माहिती अशी, १५ वा वित्त आयोगातून सावर्डे पा. ग्रामपंचायतीने मगासवर्गीय समाजातील समाज मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे यासाठी सर्व कामे झटपट करण्याच्या हेतूने ग्रामपंचायतीने तात्काळ निर्णय घेऊन कामाला सुरुवात केली

. यामध्ये समाज मंदिराच्या खिडक्यांचे काम गावातील तरुण प्रदोष सुतार याच्याकडे दिले. हे त्या तरुणाने स्वतः च्या जबाबदारीवर ठरवलेल्या मोबदल्यात वेळेवर करून दिले; याचा काही मोबदला त्याला मिळाला पण त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच ,सदस्य यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. या कामाला ३-४ महिने उलटूनही कोणीच आपली दाद घेत नाही हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने थेट समाज मंदिरात जाऊन त्या खिडक्याच काढून टाकल्या.

त्याच्याशी याबाबत विचारणा केल्यानंतर हा सगळा प्रकार आपण का केला हे उघाकिस आले. माझ्या कामाचा मोबदला मला मिळत नाही तोपर्यंत आपण त्या खिडक्या बसवणार नाही असे स्पष्ट मत त्याने व्यक्त केले. त्यामुळे आता तरी ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच, सचिव व सदस्य यांचे डोळे उघडतील. असे बोलताना त्याने सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा