नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि सिटू संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंत्रालयात कामगार मंत्री नाम. सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि सिटू संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंत्रालयात कामगार मंत्री नाम. सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

बातमीदार/ प्रज्ञावंत. कॉम(दि.१४सप्टे.२०२३):

सदरच्या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले

१)तपासणी ते उपचार परीपत्रकमध्ये जाचक अटी रद्द करणार. या योजनेतील परीपत्रकामध्ये दुरूस्ती करून कामगारांना सहज उपचार घेता येतील तसेच या योजनेत आई वडीलासह कुटुंबातील सर्व सदस्यांना मोफत उपचार घेण्यात येणार,तसेच कामगाराला हॉस्पिटल व सर्व तपासण्यांची साठी लॅब ची सुविधा प्रत्येक जिल्ह्यात रुग्णवाहिका , व उपचार काळातील वेतन देन्याचा निर्णय झाला.’तपासणी ते उपचार’ या योजनेत प्रत्येक जिल्ह्यात ५ रुग्णालये व रोग निदान केंद्र संलग्न करणार, यात कामगारांच्या कुटुंबाला दोन लाखांपर्यंतचे उपचार मिळणार असून पाच हजारांची औषधे आणि २३ तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.

 

२) कामगारांचे आरोग्य, घरकुल, मुलांचे शिक्षण यावर भर दिला जाणार

 

३)कामगारांच्या पाल्यांना बी.फार्म. करण्यासाठी २० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते, या रकमेत वाढ करण्यासोबतच पी.एच.डी. आणि एम.फील. करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन लागू करणार

 

४) मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी कामगारांना नाक्यावर थांबण्यासाठी शेड उभारणी करणार

 

५)या शेडमध्ये पाणी, स्वच्छतागृह यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील

 

६) कामगारांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू करणार

 

७)कामगार विभागात लवकरच भरती प्रक्रिया राबवणार आहे त्यामुळे कामगारांना लाभ वेळेत मिळण्यास मदत होईल

 

८) राज्यात मोठ्या संख्येने बांधकाम चालू आहे, त्याठिकाणचा मंडळाचा उपकर वाढविण्यासाठी कामगार संघटनांचे सहकार्य घेणार

 

९) चुकीच्या तृटी काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश मंडळ सचिवांना दिले.

 

१०) एकच दाखला जोडल्यानतंर कामगारांचे पेंडीग नुतनीकरण करण्याचाही निर्णय घेण्यात आला

 

११) कामगारांचे अर्ज तपसाल्यानतंर अर्जात तृटी असल्यास सदर तृटी ७ दिवसात पूर्ण करावी लागत होती. त्यामध्ये सुधारणा करून तो कालावधी २१ दिवस करण्याचा निर्णय झाला.

 

१२) शहरातील नाका कामगारांना हजेरी कार्ड देऊन हजेरी कार्डावर 90 दिवसाचे काम केल्याचे दिसून आल्यास नोंदणी/नुतनीकरण करणार

 

१३) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसह सर्व योजनांच्या लाभाच्या रकमेमध्ये काही वाढ करणार

 

१४) ग्रेस पिरियड मधील नोंदणी किंवा नूतनीकरणासाठी अर्ज केलेल्या कामगाराचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास कामगाराच्या वारसास लाभ देण्यात येणार

 

१५) सर्व सर्चिग पद्धत बंद करून रोटेशन पद्धतीने कामकाज चालणार

 

१६) मृत्यूलाभ देताना पेन्शन व अंत्यसंस्कार निधी हे वेगवेगळे न देता ते एकत्रितच देणार.

 

१७) मंडळाकडील कांही धोरणात्मक मागण्यांची चर्चा बोर्ड मिटींगमध्ये करणार

 

या मिटींगमधे बांधकाम कामगारांच्या वतीने आ. विनोद निकोले,डॉ डी एल कराड (सिटु राष्ट्रीय उपाध्यक्ष) , कॉ एम एच शेख (राज्य जनरल सेक्रेटरी सिटु), कॉ के. आर. रघु, कॉ भरमा कांबळे (राज जनरल सेक्रेटरी, बांधकाम फेडरेशन),कॉ शिवाजी मगदूम, कॉ प्रकाश कुंभार, कॉ के नारायण यांनी बांधकाम कामगारांच्या भूमिका व मागण्या मांडल्या.

 

या बैठकीला प्रशासकीय अधिकारी सौ. विनीता वेद सिंगल, (प्रधान सचिव कामगार), श्री सतिश देशमुख (कामगार आयुक्त), श्री.दादासाो खताळ (उपसचिव कामगार),

श्री.बाबासाहेब शिंदे (अवर सचिव कामगार),

श्री.विवेक कुंभार (बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सचिव), श्री.शैलेंद्र पोळ (कामगार उपायुक्त पुणे विभाग) आदी उपस्थित होते.

जाहिरातयावेळी संघटनेचे कॉ संदीप सुतार, कॉ भगवानराव घोरपडे, कॉ विक्रम खतकर, कॉ आनंदा कराडे, कॉ नुरमहमद बेळकुडे, कॉ हणमंत कोळी, कॉ ओम पुरी, कॉ के नारायण, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा