नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेजमध्ये करियर कौन्सिलिंग प्रोग्रॅम संपन्न – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेजमध्ये करियर कौन्सिलिंग प्रोग्रॅम संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पत्रकार/उत्तम कांबळे केनवडेकर.

मुरगूड (दि.११ सप्टें.): शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड येथे करियर कौन्सिलिंग प्रोग्रॅम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस्.आर् .पाटील होते. यावेळी विवेक माळवे व नितीन हरुगडे या दोन प्रमुख उपस्थित मान्यवरांनी सी.ए या विषयावर विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.

उद्योग व्यवसाय मध्ये नोकरीच्या वाटा शोधत असताना विद्यार्थ्यांना प्रामुख्याने आत्मविश्वासाच्या बळावरच सामोरे जावे लागते. सीए सारखे क्षेत्रामध्ये रोजगाराच्या वाटा उपलब्ध आहेत. सीए होण्यामध्ये मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मुलांनीही याकडे दुर्लक्ष न करता सीए व्हावे असे मत विवेक माळवे व नितीन हरुगडे यांनी व्यक्त केले. प्राचार्य एस.आर.पाटील यांचेही यावेळी भाषण झाले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख एम. ए. बसर्गे यांनी केले. या कार्यक्रमास शिक्षक प्रतिनिधी टि.एस.पाटील, टी.आर.शेळके, पी.एस.पाटील. इत्यादी मान्यवर हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल.के.पाटील यांनी तर आभार आर.सी.कांबळे यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा