नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सकल मराठा समाजाच्या वतीने आज कोल्हापूर बंद; जालन्यातील मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

सकल मराठा समाजाच्या वतीने आज कोल्हापूर बंद; जालन्यातील मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोल्हापूर ( दिनांक ५ सप्टेंबर):जालन्यातील लाठीमार प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. जालन्यातील लाठीमार प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या घटनेवरून अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

जालन्यातील लाठीमार प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. जालन्यातील मराठा समाजातील आंदोलकांवर शुक्रवारी लाठीमार प्रकरणानंतर राज्यातील अनेक भागात तीव्र पडसाद उमटले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाकडून अनेक जिल्ह्यात बंद देण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील घडल्या आहेत.

मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणी उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. यामुळे उद्या कोल्हापूर शहर बंद राहणार आहे. शहर परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

कोल्हापुरात एसटी वाहतूक ठप्प

दरम्यान, जालना लाठीमार प्रकरणामुळे पुण्याहून जालना, संभाजीनगर, नांदेडला जाणारी बससेवा ठप्प झाली आहे. गेल्यी तीन दिवसांपासून बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर परीक्षेसाठी कसं जायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जाहिरात



या घटनेमुळे कोल्हापुरातून पुण्याकडे जाणारी एसटी वाहतूक सेवा तात्पुरती थांबविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी पर्यायी मार्ग म्हणून खासगी वाहतूक किंवा रेल्वेचा मार्ग निवडताना दिसत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा