नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भुदरगड तालुक्यातील मुदाळ गाव आहे ट्रकचं गाव  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

भुदरगड तालुक्यातील मुदाळ गाव आहे ट्रकचं गाव 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

भुदरगड प्रतिनिधी( ३ सप्टें.) : गाव म्हटलं की, प्रत्येकाला आपल्या गावची वैशिष्टयपूर्ण असणाऱ्या गोष्टींची ओळख होत असते. मग तिथला परिसर असो किंवा त्या गावचे प्रसिद्ध ठिकाण असो या वर त्या गावची ओळख ठरत असते; परंतु भुदरगड तालुक्यातील मुदाळ या गावाची ओळख मात्र एका आगळ्यावेगळ्या कारणामुळे आता सर्वत्र होत आहे. या गावात रस्त्याच्या बाजूने , रिकाम्या जागी अथवा कालव्याच्या ठिकाणी कोठेही एखादी चक्कर मारली तर ट्रक ची संख्या जास्त दिसते. या गावात मिळालेल्या माहितीनुसार तब्बल साडे चारशे ते पाचशे ट्रक आहेत. त्यामुळे या गावाला आता ट्रकचे गाव अशी नवी ओळख प्राप्त होत आहे.

या गावचा इतिहास देखील फार वेगळा आहे. या गावात पूर्वी मीठ विक्रीचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात केला जात होता किंबहुना आज ही काही प्रमाणत हा व्यवसाय केला जातो. त्यामुळे या गावातील लोकांना मीठ व्यापारी किंवा मिटकरी या नावाने आजही ओळखतात. गावोगावी जाऊन या हे मिटकरी धान्य घेऊन मीठ द्यायचे पुढे याच व्यवसायात प्रगती करत पुढे ट्रक व्यवसायात आपले नशीब आजमावत गेले आणि पुढे याच व्यवसायात प्रगती करत हे गाव आज ट्रकचे गाव म्हणून नावारूपास आले.

या गावात जर विचारपूस केली असता , प्रत्येक घरात एक ट्रक मालक दिसेल जरी ट्रक मालक नसला तरी ट्रक चालक तरी नक्कीच दिसेल. या गावात ट्रकची संख्या जास्त असल्याने आता या गावात ट्रकचे सर्व पार्ट मिळतातच, त्याचबरोबर ट्रकशी संबंधित सर्व उद्योग या गावात पहावयास मिळतात.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा