नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रक्षाबंधनाला भावाने ओवाळणी म्हणून दिले भारतीय संविधान व हिंदू कोड बिल ग्रंथ भेट; ओबीसी समजाच्या युवकाने ठेवला नवा आदर्श   – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

रक्षाबंधनाला भावाने ओवाळणी म्हणून दिले भारतीय संविधान व हिंदू कोड बिल ग्रंथ भेट; ओबीसी समजाच्या युवकाने ठेवला नवा आदर्श  

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राधानगरी प्रतिनिधी(दि.०२ सप्टे.): रक्षाबंधन या सणाला भावाने आपल्या बहिणीचे सर्व संकटापासून संरक्षण करावे यासाठी बहीण आपल्या भावाला धागा बांधून त्याचे औक्षण करते . परंपरेनुसार या दिवशी बहीण भावाला राखी बांधते व भाऊ तिला भेट स्वरूपात ओवाळणी देतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सणाला प्रत्येक भाऊ काहीतरी भेट वस्तू देवूनच बहिणीला खुश ठेवतो. परंतु या वर्षीच्या रक्षा बंधन सणाला राधानगरी गावातील तरसंबळे या गावातील एका ओबीसी समाजातील तरुणाने आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भारतीय संविधान व हिंदू कोड बिल ही दोन पुस्तके देवून भारतीय स्त्रियांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनण्याचा नवा मूलमंत्र दिला आहे. या युवकाचे नाव आहे. सागर सुतार.

या बाबत मिळालेली माहिती अशी, ओबीसी समाजात जन्मलेला सागर हा महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन समाजप्रबोधनाचे काम करतो असतो त्यामुळे तो घरात कमी आणि बाहेर जास्त असतो .  या वर्षीच्या रक्षाबंधनाला तो घरी असल्याने त्याच्या बहिणीला देखील खूप आनंद झाला होता. रक्षाबंधनाच्या दिवशी सागरच्या बहिणीने त्याला ओवाळले असता त्याने चक्क ओवाळणी म्हणून भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हिंदू कोड बील हे दोन ग्रंथ देऊन सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला.

आपली बहीण वर्षाराणी हिला भेट देताना सागर सुतार

त्याच्या बहिणीवर देखील त्याच्या विचाराचा प्रभाव असल्याने तिला हे पाहून फार आनंद झाला. त्याच्या बहिणीने त्याला या बाबत विचारले असता. तो म्हणाला, ” मी तुझे कायमच रक्षण करेन;परंतु भारतीय संविधान तुझे नेहमीच रक्षण करेल.’ त्याच्या या विधानाने आजच्या आधुनिक युगातील त्याच्या बहिणीला न्हवे तर सबंध भारतातील स्त्रियांना भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कांची नक्कीच जाणीव करून दिली असेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू स्त्रियांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावे म्हणून आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला. स्त्रियांसाठी संविधानात अनेक त्यांच्यासाठी अनेक हक्क व अधिकार मिळवून दिले ; परंतु याचा विसर आजच्या समाजातील स्त्रियांना पडलेला दिसत आहे म्हणूनच  त्याच्या या कृतीचे सर्वच बहुजन समाजातून कौतुक होत आहे.

 

 

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा