नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तरसाच्या हल्ल्यात २शेळ्यांसह ३ बकरी ठार; काळम्मावाडी जंगल परिसरात भीतीचे वातावरण – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

तरसाच्या हल्ल्यात २शेळ्यांसह ३ बकरी ठार; काळम्मावाडी जंगल परिसरात भीतीचे वातावरण

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

प्रज्ञावंत ऑनलाईन (दिनांक २६ऑगस्ट):

भुदरगड तालुक्यातील हेदवडे पैकी काळम्मावाडी जंगल परिसरात तरसाने केलेल्या हल्ल्यात २ शेळ्यांसह ३ बकरी ठार झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.वनविभागाने नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बंडू गुंडू खोत (रा. हेदवडे पैकी काळम्मावाडी) हे रानामध्ये शेळ्या चरत होते. यावेळी तरस या वन्य प्राण्यांने शेळीच्या कळपावर हल्ला केला. यात दोन शेळ्या व तीन बकरी ठार झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ वनपाल मारुती डवरी, संजय चौगुले, विजय खोत (माजी सरपंच) यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

हेदवडे गिरगाव हा परिसर राधानगरी अभयारण्यास लागून आहे. त्यामुळे या ठिकाणी सांबर, बिबट्या, तरस, जंगली कुत्रा (वाईल्ड डॉग) अशा प्रकारचे वन्य प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे ग्रामस्थांनी आपली जनावरे घेवून लांब रानात सहसा जावू नये, वसाहतीच्या आसपास चराई करावी, असे आवाहन वनपाल मारुती डवरी यांनी केले आहे.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा