नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सावर्डे पा. गावाला आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून आणखी २० लाख रुपयांचा निधी मंजूर – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

सावर्डे पा. गावाला आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून आणखी २० लाख रुपयांचा निधी मंजूर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

सावर्डे पा.( १८ ऑगस्ट) : गेल्या काही दिवसांपूर्वी दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत राधानगरी – भुदरगड मतदार संघातील आमदार प्रकाश आबिटकर यांनी सावर्डे पा. गावातील कांबळे समाजासाठी त्यांच्या मागणीवरून बौद्ध विहाराकरिता वीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

    या गोष्टीला अगदी काही काळच उलटून गेला असेल तो पर्यंत आता याच गावासाठी त्यांच्या प्रयत्नातून पुन्हा वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची बातमी हाती लागली आहे .हा निधी गावातील खूप दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या स्मशान भूमीसाठी व ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार असल्याचे म्हंटले जात आहे. गेल्या महिन्यापासूनच गावासाठी एकूण तब्बल चाळीस लाख रुपयांचा निधी आल्याने गावातील विकास कामांना आता वेग येईल असे मत गावातील ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच तसेच सदस्य यांच्यातून व्यक्त होत आहे. तरी स्मशान भूमी व ग्रामपंचायत विस्तारीकरण यासाठी मजूर झालेला निधी हा २५/१५ विकास योजनेतून मंजूर झाल्याचे वृत्त गावच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती. सुमन विलास मोरे यांनी दिले.

काय आहे २५/१५ विकास योजना 

राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यासाठी लोकप्रतिनिधींकडून मुलभूत सुविधांसाठी निधीची मागणी होत असते. ही बाब विचारात घेऊन शासनाने लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे ही योजना सुरू करण्यात आली आहे. सदर योजना जिल्हा परिषदांमार्फत राबविण्यात येत होती. तथापि, लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या मुलभूत सुविधांच्या कामासंदर्भात संभ्रमावस्था राहू नये व या योजनेंतर्गत अवलंबिण्यात येणाऱ्या कार्यप्रणालीमध्ये अधिक सुस्पष्टता व सुसूत्रता यावी म्हणून या योजनेंतर्गत अर्ज कोणत्या प्राधिकरणाकडे करणे, निवडायची कामे, तपासणी इत्यादी. या संदर्भातील यापूर्वीचे सर्व आदेश अधिक्रमित करुन शासन निर्णय क्र.विकास-२०१५/प्र.क्र.५२/यो-६, दि.27.03.2015 अन्वये खालीलप्रमाणे सुधारित कार्यपध्दती विहीत करण्यात आली आहे यालाच २५/१५ योजना म्हणजेच लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे योजना असे नाव देण्यात आले आहे.

  योजनेंतर्गत घ्यावयाची कामे:  

          गावांतर्गत रस्ते, गटारे, पाऊसपाणी निचरा दहन व दफन भूमीची सुधारणा करणे, संरक्षक भिंत, ग्राम पंचायत कार्यालय बांधकाम करणे, आठवडी बाजारासाठी सुविधा, गावामध्ये कचरा डेपोसाठी व प्राथमिक प्रक्रियेसाठी सुविधा, सार्वजनिक जागेत वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण, सामाजिक सभागृह/ समाज मंदिर, सार्वजनिक शौचालय, रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, व्यायामशाळा/ आखाडा बांधकाम करणे, प्रवासी निवारा शेड, वाचनालय बांधकाम करणे, नदीघाट बांधकाम करणे, बगीचे व सुशोभिकरण, पथदिवे, चौकाचे सुशोभिकरण व अन्य मुलभूत बाबी.

या निधीतून योग्यप्रकारे कामे होण्याच्या दृष्टीने दरवर्षी कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे त्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात येतो.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा