नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कासारपुतळे गावात आढळले आठ फूट लांब अजगर ; सर्पमित्र बाजीराव कुदळे व शशिकांत चव्हाण यांच्या मदतीने पकडण्यात यश  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

कासारपुतळे गावात आढळले आठ फूट लांब अजगर ; सर्पमित्र बाजीराव कुदळे व शशिकांत चव्हाण यांच्या मदतीने पकडण्यात यश 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राधानगरी ( दिनांक १८ ऑगस्ट) : राधानगरी तील कासारपुतळे (पा.) गावात दिनांक १७ ऑगस्ट रोजी दुपारी १:४५ वाजता अजगर सापडले असून याला सर्पमित्र बाजीराव कुदळे यांच्या मदतीने पकडण्यात यश आले आहे. या अजगराची लांबी तब्बल आठ फूट असून त्याचे वजन १५ किलो इतके आहे.

सर्पमित्र बाजीराव कुदळे पकडलेल्या अजगराची माहिती देताना

याबाबत मिळालेली माहिती अशी , दूधगंगा नदीकाठी कासारपुतळे गावातील श्री. कृष्णात सूर्यवंशी यांची शेत आहे. या शेताकडे जात असताना त्यांना वाटेत रस्त्यावर हे अजगर पडलेले दिसले त्यानंतर त्यांनी उंदरवाडी गावातील सर्पमित्र श्री. बाजीराव कुदळे व श्री. शशिकांत चव्हाण यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून घडलेला सविस्तर प्रकार  सांगितला त्यानंतर लगेचच बाजीराव कुदळे यांनी घटनास्थळी जावून त्या गोष्टीची पाहणी केली तेव्हा त्यांना शेतातील चिखलात त्याच्या खुणा आढळल्या त्या खुणांचा माग काढत  ते पुढे गेले असता शेतात ते अजगर मुंगूस खाल्याने सुस्त पडल्याचे दिसले . त्यानंतर बाजीराव कुदळे व त्यांचे सहकारी शशिकांत चव्हाण यांनी त्याला पकडून ताब्यात घेतले.

 

 

काही दिवसापूर्वी सावर्डे पा. मध्ये पहावयास मिळालेले होते अजगर

 

दिनांक १४ ऑगस्ट रोजी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास सुशांत सावंत व त्याचे सहकारी सुळंबी मार्गे येत असताना हे अजगर रस्त्यावरून पलीकडे जाताना दिसले होते ही बातमी साप्ताहिक प्रज्ञावंत न्यूज द्वारे वन विभागा पर्यंत गेली होती व संबंधीत अधिकाऱ्यांनी देखील याची दखल घेतली होती ;परंतु आता हे अजगर सापडल्यामुळे सावर्डे पा.तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये याची भीती कमी होण्यास मदत झाली आहे.

 

 

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा