नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अतिदुर्मिळ बॉम्बे ब्लडग्रुपचे एकाच रुग्णाला तब्बल सात वेळा रक्तदान – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

अतिदुर्मिळ बॉम्बे ब्लडग्रुपचे एकाच रुग्णाला तब्बल सात वेळा रक्तदान

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोल्हापूर (१८ ऑगस्ट) : नांदोस येथील राजाराम गोविंद गावडे (वय ६६) यांना डायलिसिससाठी अतिदुर्मिळ अशा बाँबे ब्लड ग्रुपच्या रक्ताची गरज होती. याची माहिती सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक तथा जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर यांना मिळताच त्यांच्या माध्यमातून कोल्हापूर येथील पोलीस विनायक कोळी यांनी सर्वात अतिदुर्मिळ अशा या रक्तगटाचे रक्तदान केले.सदर रुग्णासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापूर्वी ६ वेळा बॉम्बे रक्तगटाचे रक्त उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आले आहे.

जाहिरात

कु. साईशा प्रवीण कांबळे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 


या अति दुर्मिळ रक्तासाठी किशोर नाचणोलकर यांनी कोल्हापूर येथील पोलीस विनायक कोळी यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी शाहू रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. यासाठी बॉम्बे ब्लड ग्रुपचे ऑर्गनायझेशन विक्रमदादा यादव तसेच शाहू रक्तपेढीचे श्री जमदाडे यांचे सहकार्य लाभले. त्यानंतर किशोर नाचनोलकर यांनी स्वतः कोल्हापूर येथे जात ही ही रक्त बॅग राजाराम गावडे यांच्यासाठी उपलब्ध करून दिली. राजाराम गोविंद गावडे यांना दुर्मिळ अशा रक्तगटाचे दाते मिळवून दिल्याबद्दल गावडे कुटुंबियांनी सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठानचे आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा