नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , संपादकीय लेख भीम कवी वामनदादा कर्डक – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

संपादकीय लेख भीम कवी वामनदादा कर्डक

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

संपादकीय लेख 

महाराष्ट्राचे लोककवी, शाहीर ,आंबेडकरी चळवळीचे बुलंद कार्यकर्ते आणि समाज प्रबोधनकार वामनदादा कर्डक यांची 15 ऑगस्ट रोजी 101 वी जयंती होती. त्यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा हा लेख.

वामनदादा कर्डक यांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील देशपंडी या खेड्यात एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तबाजी तर त्यांच्या आईचे नाव सईबाई होते. त्यांना एक मोठा भाऊ व एक धाकटी बहीण होती. वामनदादा यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती, त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही. घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे उदरनिर्वाहासाठी दादा मिळेल ते काम करत होते. जत्रा यात्रा मधून ते कुस्ती खेळून मिळेल त्या पैशांमध्ये घर खर्च भागवत असत. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले पण त्यांना कौटुंबिक स्वास्थ लाभले नाही. त्यांच्या पत्नीचे अकाली निधन झाले व पुढे मुलाचे ही निधन झाले. इतके मोठे दुःख उराशी बाळगून त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत त्यांनी गिरणी कामगार म्हणून काम केले. बी डी डी चाळीत त्यांचे वास्तव्य असे तेथेच त्यांची समता सैनिक दल व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी ओळख झाली. समता सैनिक दलातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभेची तयारी करण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. वामनदादांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. त्यांना मिळालेली प्रतिभा ही जन्मदत्त देणगी होती. लहानपणापासूनच गायनाची आवड असलेल्या वामनदादांकडे लेखणी, वाणी आणि संगीत यांचा त्रिवेणी संगम होता. एक दिवस फावल्या वेळेत ते राणीच्या बागेत बसलेले असताना त्यांनी एका हिंदी चित्रपटातील गाण्याचे विडंबन केले,ते गीत त्यांनी राणीच्या बागेतील गर्दी पुढे म्हटले, त्यांचे हे विडंबन गीत उपस्थित लोकांना फारच आवडले. त्यांचा आवाज आणि त्यांचे बोल लोकांना फार आवडू लागले. पुढे ते आंबेडकरी जलसा मध्ये गाऊ लागले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी बाबासाहेबांची सभा असे त्या सभेपूर्वी वामनदादांचे गीत होत असे. बाबासाहेबांनी त्यांच्या गीताची स्तुती आपल्या भाषणांमधून अनेक वेळा केली. बाबासाहेब म्हणत माझ्या दहा भाषणाचं काम शाहीर यांचे एक गाणं करते. वामनदादांची बहुतांश असंख्य लोकगीते आहेत. वामनदादांची गीत म्हणजे कोंडलेल्या मनाचा हुंकार, वामनदादांच्या गीताचा केंद्रबिंदू हा मानव होता म्हणूनच वामनदादा म्हणतात, मानवा मी तुझे गीत गावे…. तुझे गीत व्हावे मानवता. आंबेडकर भक्ती, दलित, शोषित, स्त्रीमुक्ती, जाती व्यवस्था यावरती वामनदादांनी गीतातून समाज प्रबोधन केले. दादांनी आपल्या गीतातून हुंडाबळी, ऊसतोड कामगार, पर्यावरण, दुष्काळ व शेतकऱ्यांचे प्रश्न यावरती ही भाष्य केले. त्यांच्या गीताचे प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच होते. वामनदादांनी स्वतःला भीम कार्यात वाहून घेतले. दादांनी आपल्या असंख्य लोकगीतातून लोकांना भुरळ घातली. म्हणूनच ते लोककवी झाले. दादांनी आयुष्यभर आंबेडकरी चळवळीची व विचारांची पत्ताका आपल्या खांद्यावर वाहून घेतली. आपल्या तेजस्वी लेखणीने आणि कणखर वाणीने फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा घराघरात पोहोचविणाऱ्या या महाकवीचे 15 मे 2004 रोजी निधन झाले. लोककवी वामनदादा कर्डक यांना 101 व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

संपादक.

साप्ताहिक प्रज्ञावंत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा