नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोल्हापूरात उभारणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

कोल्हापूरात उभारणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 

पत्रकार – उत्तम कांबळे केनवडेकर.

कोल्हापूर(दि.१७ ऑगस्ट): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी ऐतिहासिक बिंदू चौकात अभिवादन करताना कोल्हापूरात डॉ. आंबेडकर यांच्या नावे भव्य ग्रंथालय आणि थीम पार्क उभारणार अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार तात्काळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररीसाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत रु.५० लाख निधी मंजूर करण्यात आला असून, सदर निधी महानगरपलिका प्रशासनाकडे वर्गही करण्यात आला आहे. सदर डिजिटल लायब्ररीची उभारणी करताना विद्यार्थी आणि युवकांना प्रेरणादायी ठरावी, अशा पद्धतीने डिजिटल लायब्ररीचे काम करावे, अशा सूचना महानगरपलिका अधिकाऱ्यांना दिल्या.

       जाहिरात

डॉ.बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररीच्या आराखड्याचे सादरीकरण शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत करण्यात आले. सदर लायब्ररी ही कोल्हापूर शहरातील आंबेडकर नगर, सदर बाजार येथील पंचशील भवन इमारतीच्या पहिल्या मजलावर २१ मीटर x १० मीटर इतक्या क्षेत्रामध्ये होणार आहे. याकरिता रु.५० लाखाचा निधी मंजूर होऊन कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कामाची वर्क ऑर्डर झालेली आहे. सदर लायब्ररीमध्ये सर्व प्रकारची पुस्तके, फर्निचर, संगणक, डिजिटल पुस्तके तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या साठीची पुस्तके यासह ग्राउंड वर खेळणाऱ्या मुलांचा गोंगट चा आवाज आत येऊ नये याकरिता साऊंड प्रूफ ची व्यवस्था इत्यादी व्यवस्था ने डिजिटल लायब्ररी सुसज्ज असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची लायब्ररी कोठेही नाही. तसेच सदर लायब्ररीचे वास्तव्य टिकून राहण्यासाठी सर्व क्षेत्रातील सदस्यांचे विश्वस्त मंडळ कार्यरत राहील. सदर च्या सुसज्ज लायब्ररी मधून मार्गदर्शक सत्र आयोजित करुन, या मार्गदर्शक विचारांचा फायदा आपल्या लोकांना होऊ शकेल, या उद्देशाने सदर लायब्ररी स्थापन करण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचे सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा