नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांची वारसा नोंद न करण्याचा निर्णय,ग्रामसभेचा ठराव – माणगाव ग्रामपंचायत – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांची वारसा नोंद न करण्याचा निर्णय,ग्रामसभेचा ठराव – माणगाव ग्रामपंचायत

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

उत्तम कांबळे केनवडेकर : आजघडीला आई- वडिलांची मालमत्ता पैसा हवा पण वृद्धापकाळात आई-वडिलांचा सांभाळ करायचा नाही, ही प्रवृत्ती समाजात फोफावत आहे. म्हातारपणी आई- वडिलांना सांभाळत नसल्यामुळे त्यांच्यावर निराधार व दु:खी जीवन जगण्याची वेळ येते. अशा अपप्रवृत्तींना आळा बसावा आणि मुलांनी, आई-वडिलांचा योग्य प्रकारे सांभाळ करावा यासाठी हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांची वारसा नोंद न करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामसभेत हा ठराव मान्य करण्यात आला.

माणगाव ग्रामपंचायत यासंबंधी प्रतिज्ञापत्रही लिहून घेण्यात येणार आहे. जी मुले व मुली आईवडिलांना सांभाळतील त्यांनाच बापाच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे वारस म्हणून हक्क मिळावे असे वारस नोंदीसाठी येणाऱ्या व्यक्तीकडून प्रतिज्ञापत्र घेण्याचे ठरले. प्रतिज्ञापत्रातील मसुदाही निश्चित केला. “मी माझ्या आईवडिलांचा सांभाळ करेन.मी त्यांना दवाखावा अथवा आरोग्याच्या बाबतीत इतरत्र कोणतीही कमतरता भासू देणार नाही. मी माझ्या कर्तव्याचे पालन करीन. माझ्याकडून या सर्व गोष्टीचे पालन झाले नाही अशी तक्रार आली किंवा शेजाऱ्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर माझ्या कर्तव्यात कसूर झाल्याचे आढळल्यास ग्रामपंचायती दफ्तरी असिसमेंटला लागलेले नाव तत्काळ कमी करण्यात यावे. तसेच माझ्या घरी असलेले नळ कनेक्शन खंडित करण्यात यावे. याबाबत मी, कोठेही कसलीही तक्रार करणार नाही.”असे प्रतिज्ञापत्र घेण्यात येणार आहे.

14 ऑगस्ट रोजी माणगाव ग्रामपंचायतीची सभा झाली. ग्रामसभेत हा २४ नंबरचा विषय होता. या ठरावाचे सूचक समीर अल्लाउद्दीन जमादार यांनी तर अनुमोदक दिपक महाजन आहेत.ग्रामसभेने हा ठराव मान्य केला.आई-वडिलांची संपत्ती मुलांच्या नावे झाल्यावर म्हातारपणी मुले पालकांचा सांभाळ करत नाहीत अशा तक्रारी येत होत्या. माणगाव ग्रामस्थांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माणगाव पंचक्रोशी या निर्णयाचे कौतुक होत आहे.

जाहिरात

जी मुले आई-वडिलांचा सांभाळ करणार नाहीत अशा मुलांचा वारसा असिसमेंटवरील नाव कमी करण्याचा ठराव ग्रामसभेत पास केला. यासंबंधी मुलांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात येणार आहे. यामुळे चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या मुलांना चाप बसेल. यामुळे आईवडिलांना अनाथालय व वृद्धाश्रमात ठेवायची वेळ येणार नाही. असे प्रतिपादन माणगाव ग्रामपंचायत सरपंच डॉ. राजू मगदूम यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा