नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भूकंपाच्या धक्क्याने हादरले कोल्हापूर – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

भूकंपाच्या धक्क्याने हादरले कोल्हापूर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोल्हापूर(१६ ऑगस्ट ) :पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. आज सकाळी ६.४५ च्या सुमारास हे धक्के बसले. भूकंपमापकावर तब्बल ३.४ रिश्टर स्केलची नोंद झाली.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू हा जमिनीखाली ५ किमी खाली होता. आज सकाळी ६.४५ च्या सुमारास मोठा धरणीकंप झाला. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. भीतीपोटी अनेक नागरिक घराबाहेर पडले.

कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात हे धक्के जाणवले. कोल्हापूर पासून ७६ किमी अंतरावर चांदोली अभयारण्य देखील हे भूकंपाचे धक्के जाणवले. तर सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह आसपासच्या गावात भूकंपाचे धक्के बसले. दरम्यान, सकाळी कामानिमित्त तसेच फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले.

यासोबतच कोयना धरण परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात देखील भूकंपाचे धक्के बसले आहे. येथील चांदोली अभयारण्य परिसरापासून १५ किमी परिसरात हे धक्के बसले. या भूकंपामुळे सुदैवाने कुठेही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी ते काही काळ बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट होते. अनेक नागरिक सुरक्षेचा उपाय म्हणून घराबाहेर पडले

          जाहिरात

 

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा